कार्यालयीन गृपवर झाली अश्लिल चित्रफित व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 12:35 PM2020-10-30T12:35:28+5:302020-10-30T12:35:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कार्यालयीन कामकाजाच्या  व्हॅाट्‌सअप गृपवर तीन दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्याने टाकलेल्या पावणे दोन मिनिटांच्या अश्लिल  चित्रफितीची ...

The pornographic video went viral on the office group | कार्यालयीन गृपवर झाली अश्लिल चित्रफित व्हायरल

कार्यालयीन गृपवर झाली अश्लिल चित्रफित व्हायरल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कार्यालयीन कामकाजाच्या  व्हॅाट्‌सअप गृपवर तीन दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्याने टाकलेल्या पावणे दोन मिनिटांच्या अश्लिल  चित्रफितीची चर्चा शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच चघळली जात आहे. या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला जामीनही मिळाला आहे. अनवधानाने हा प्रकार घडल्याचे संबधीत कर्मचाऱ्याचे म्हणणेआहे.
नंदुरबार आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा व्हॅाट्‌सअप गृप आहे. त्यावर कार्यालयीन कामाकाजाविषयी सुचना, आदेश तसेच इतर माहिती शेअर केली जाते. या गृपमध्ये एकुण ५३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यात सहा महिला अधिकारी व कर्मचारी देखील आहेत.  या गृपवर सोमवारी रात्री सहायक नियोजन अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याने एक पावणे दोन मिनिटांची अश्लिल चित्रफित व्हायरल केली. चित्रफित टाकल्यानंतर संबधीताला त्याचे भान राहिले नाही. तोपर्यत अनेकांची ती चित्रफित आपल्या नजरेखालून घातली देखील. 
काहींनी संबधीताला फोन करून ती डीलेट करण्याचे सांगितले. तोपर्यत उशीर झाला होता. यामुळे मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. मंगळवारी या बाबीची चर्चा जोरात राहिली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे ठरविण्यात आले. 
प्रकल्प कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक यांनी याबाबत शहर पोलिसात फिर्याद दिली. महिला अधिकाऱ्यांना लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी तसेच समाज माध्यम विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेण्यात आला. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक कळमकर यांनी संबधीताला ताब्यात घेत न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसांची कोठडी सुनावली, नंतर त्यांचा जामीन झाला. 
रात्री नशेत अनवधनाने हे कृत्य झाल्याचे त्यांचे म्हणने असल्याचे पोलीसांचे म्हणने आहे. दरम्यान, या प्रकाराचे चर्वीतचर्वण शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. 

Web Title: The pornographic video went viral on the office group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.