तळोद्यात पालिका कर्मचा:यांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 12:21 IST2019-06-15T12:21:03+5:302019-06-15T12:21:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : नगरपालिका कार्यालयीन कर्मचारी वर्ग तीन आणि चार तसेच सेवानिवृत्तांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात ...

तळोद्यात पालिका कर्मचा:यांचे धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : नगरपालिका कार्यालयीन कर्मचारी वर्ग तीन आणि चार तसेच सेवानिवृत्तांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा अशी मागणी कर्मचा:यांनी केली़ शुक्रवारी तळोदा नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन मागणीचे निवेदन कर्मचा:यांनी मुख्याधिकारी यांना दिल़े
निवेदनात, तळोदा नगरपालिका कार्यालयीन कर्मचारी वर्ग 3 आणि 4 यांना शासन निर्णयाप्रमाणे 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू झाला आह़े शासनाच्या आदेशाप्रमाणे नगरपालिका संवर्ग कर्मचारी यांना मे 2019 पासून वेतन देण्यात आलेले आह़े परंतू पालिकेचे वर्ग तीन आणि चार तसेच सेवानिवृत्त कर्मचा:यांना आयोग लागू करण्यात आलेला नाही़ त्यामुळे कर्मचा:यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े कर्मचा:यांना शासननिर्णयाप्रमाणे सवलती लागू करुन कारवाई करण्यात यावी, आयोग लागू न झाल्यास तळोदा पालिका कर्मचारी संघटना 2 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आह़े निवेदनावर सुनिल पुंडलिक सूर्यवंशी, मोहन तोताराम सूर्यवंशी, गोरख गोपाळ माळी, नारायण बन्सी चौधरी, अनिल नगीन माळी, राजेंद्र प्रतापराव माळी, नितीन वेडू शिरसाठ, लताबाई आनंदा बच्छाव, जिवन परदेशी, दिलीप बाविस्कर, सुरेश माळी, गोरख जाधव, छोटू सिपा चौधरी, नटवरलाल दगडू कर्णकार, अनिल बन्सी माळी, गंगाराम सिताराम नाईक, जमुनाबाई शरद पाडवी, कमलेश रविंद्र कलाल, मिलींद सदाशिव ब्राrाणे यांच्यासह कर्मचा:यांच्या सह्या आहेत़
पालिकेच्या इमारतीसमोर सर्व कर्मचा:यांनी घोषणा देत धरणे दिल़े आंदोलनात सेवानिवृत्त कर्मचा:यांचा सहभाग होता़ प्रसंगी कर्मचारी संघटनेसोबत मुख्याधिकारी यांनी चर्चा केली़