पूजा चव्हाण यांच्या मृत्यूप्रकरणी तळोद्यात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:35 IST2021-03-01T04:35:26+5:302021-03-01T04:35:26+5:30
पूजा चव्हाण यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही. त्यांचा मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप असताना ...

पूजा चव्हाण यांच्या मृत्यूप्रकरणी तळोद्यात आंदोलन
पूजा चव्हाण यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केलेला नाही. त्यांचा मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप असताना त्यांना सरकार पाठीशी घालत आहे. याच्या निषेधार्थ तळोदा भाजप महिला मोर्चाच्या वतीने येथील चिनोदा चौफुलीवर आंदोलन छेडण्यात आले. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना तेथून तातडीने ताब्यात घेतले. आंदोलकांनी पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांना निवेदन दिले. आंदोलनात तालुकाध्यक्षा भारती कलाल, शहराध्यक्षा रसिला देसाई, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, सुनीता पंजाबी, अंबिका शेंडे, जागृती देसाई, नंदा ठाकरे, भारती पावरा, जयमाला पाडवी, मुन्नी वसावे, संगीता पाडवी, दीपमाला वळवी, सपना पाडवी, वंती तडवी, कोकिळा माळी, वंदना माळी, तळोदा तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, हेमलाल मगरे, रामानंद ठाकरे, शिरीष माळी आदी सहभागी झाले होते.