पॉलीहाऊस नुकसान भरपाई पाच वर्षापासून प्रलंबीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 11:29 IST2019-09-13T11:29:19+5:302019-09-13T11:29:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पॉलीहाऊस व फुलशेतीचे जून 2014 मध्ये नुकसान होऊन कृषी विभागाने 98 लाखांचा पंचनामा केला ...

पॉलीहाऊस नुकसान भरपाई पाच वर्षापासून प्रलंबीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पॉलीहाऊस व फुलशेतीचे जून 2014 मध्ये नुकसान होऊन कृषी विभागाने 98 लाखांचा पंचनामा केला होता. परंतु नुकसान भरपाई मिळाली नाही. दीड कोटीचा विमा असतांना केवळ 18 लाखात बोळवण करण्यात आल्याची कैफियत पिंगाणे येथील कैलास पाटील व इतर नऊ शेतक:यांची आहे.
याबाबत जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2 जून 2014 रोजी वादळी पावसामुळे पॉलीहाऊस व फूलशेतीचे नुकसान झाले होते. पंचनाम्यानुसार 98 लाखांचे नुकसान दाखविण्यात आले होते. पॉलीहाऊस व फूलशेतीचा एकुण दीड लाखांचा विमा असतांना विमा कंपनीने केवळ 18 लाख नुकसान भरपाई दिली. याशिवाय एनएचबीची 50 टक्के सबसिडी देखील मिळाली नाही. 4 नोव्हेंबर 2018 रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिका:यांनी संबधीत कृषी अधिकारी, बँक अधिकारी यांची बैठक घेतली होती. त्यानंतरही हालाचाल झाली नाही. शासकीय यंत्रणांनी पुर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई व सबसिडीची रक्कम मिळावी अशी मागणी कैलास पाटील व इतर नऊ सदस्यांनी केली आहे.