93 पैकी केवळ आठच ग्रामपंचायतींसाठी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 12:09 IST2019-06-14T12:08:04+5:302019-06-14T12:09:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 63 ग्रामपंचायतींच्या 91 सदस्य आणि 2 लोकनियु्क्त सरपंच पदासाठी पोटनिवडणूक ...

Polling for only eight Gram Panchayats out of 93 | 93 पैकी केवळ आठच ग्रामपंचायतींसाठी मतदान

93 पैकी केवळ आठच ग्रामपंचायतींसाठी मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 63 ग्रामपंचायतींच्या 91 सदस्य आणि 2 लोकनियु्क्त सरपंच पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर केला होता़ यांतर्गत सोमवारी माघारीच्या अंतिम मुदतीत 46 सदस्य आणि एका जागी लोकनियुक्त सरपंच बिनविरोध निवडून आल़े उर्वरित 46 पैकी 37 ठिकाणी निवडणूक रद्द तर आठ ठिकाणी 23 जून रोजी मतदान होणार आह़े      
31 मे पासून सुरु झालेल्या निवडणूक प्रक्रियेंतर्गत उमेदवारांकडून 78 अर्ज दाखल करण्यात आले होत़े यात 69 अर्ज हे सदस्य तर आठ अर्ज हे अक्कलकुवा येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी होत़े 91 सदस्य  निवड प्रक्रियेसाठी अंतिम मुदतीत केवळ 69 अर्ज आल्याने 22 ठिकाणी निवडणूक रद्द होण्याचे निश्चित झाले होत़े यातून बिनविरोध सदस्य संख्या समोर आल्यानंतर 23 जून रोजी अक्कलकुवा आणि नंदुरबार या दोनच तालुक्यात मतदान होणार असल्याने प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आह़े  शहादा तालुक्यात निम्मे ठिकाणी निवडणूक रद्द होण्याची सलग तिसरी वेळ आल्याची माहिती देण्यात आली आह़े तालुक्यात  सदस्यपदाच्या सर्वाधिक 52 सदस्य आणि 1 लोकनियुक्त सरपंच पदासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला असताना मतदान होणार नसल्याने प्रशासनाने करुन ठेवलेली तयारी वाया जाणार आह़े 
धडगाव तालुक्यातील चुलवड येथील एका जागा बिनविरोध झाली़ तळोदा तालुक्यात सात जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्या तर तीन ठिकाणी अजर्च प्राप्त होऊ शकले नाहीत़ नवापुर तालुक्यात सात ग्रामपंचायतीत प्रत्येकी एक सदस्यपदाची पोटनिवडणूक होती़ यातील पाच जागा बिनविरोध झाल्या तर दोन ठिकाणी अजर्च आलेले नाहीत़ एकीकडे बहुतांश ठिकाणी अर्ज नसताना अक्कलकुव्यात मात्र निवडणूकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत आह़े 

शहादा तालुक्यात सदस्यपदाच्या 52 तर लोकनियुक्त सरपंच पदाची एक अशा 53 ठिकाणी पोटनिवडणूक होती़ पैकी सदस्यपदाच्या 25 आणि करजई येथे लोकनियुक्त सरपंचपदाची 1 अशा 26 जागा बिनविरोध झाल्या आहेत़ उर्वरित 26 ठिकाणी अजर्च दाखल झालेले नसल्याने तेथील निवडणूक रद्द झाली़ बोराळे येथे सदस्यपदाच्या 2, नवानगर 3, तितरी येथे 3, करजई, उधळोद, गोदीपूर, कुढावद तर्फे सारंगखेडा, कुसुमवाडा, तोरखेडा, लंगडी भवानी, ब्राrाणपुरी, वडछील, त:हाडी, जुनवणे याठिकाणी सदस्य निवड बिनविरोध झाली़ तर शहादा तालुक्यातील  कु:हावद तर्फे सारंगखेडा येथे 2, ओझर्टा, परिवर्धे, बुडीगव्हाण, अलखेड, काकर्दे दिगर, पिंप्री, कमरावद येथे 3, मलोणी येथे 2, कजर्त येथे 2, सावळदा येथे 2, लक्कडकोट 2, काथर्दे खुर्दे,  टेंभे तर्फे शहादा, त:हाडी तर्फे बोरद, शिरुड दिगर, बुपकरी या ग्रामपंचायतीसाठी अजर्च दाखल न झाल्याने तेथील निवडणूक रद्द झाली आह़े याठिकाणी येत्या काळात नव्याने पोटनिवडणूक कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े 

तालुक्यातील पावला, वेळावद, नळवे खुर्द येथे सदस्यपदासाठी प्रत्येकी एक तर उमर्दे खुर्द येथे सदस्यपदासाठी दोन जागांसाठी 23 रोजी मतदान होणार आह़े तालुक्यात निमगाव, जांभीपाडा, केसरपाडा, करणखेडा, गुजरजांबोली, धुळवद, कोरीट, बलवंड, चौपाळे येथील सदस्यपदाच्या जागा बिनविरोध झाल्या़ तर बोराळे येथील 3, कलमाडी, खर्दे खुर्द, भोणे आणि चाकळे येथील प्रत्येकी एका जागेसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही़ येथेही येत्या काळात पुन्हा निवडणूक घेतली जाणार आह़े अक्कलकुवा तालुक्यातील राजमोही येथे 2, बेडाकुंड आणि आंबाबारी येथे प्रत्येकी 1 सदस्यपदाची पोट निवडणूक होती़ यातील बेडाकुंड येथे एकही अर्ज दाखल झाला नाही़ तर आंबाबारी येथील प्रभाग दोनमध्ये सदस्य बिनविरोध निवडून आल़े राजमोही येथे दोन प्रभागात 23 रोजी मतदान होणार आह़े 
 

Web Title: Polling for only eight Gram Panchayats out of 93

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.