शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

जिल्हा परिषदेतील राजकीय खदखद न्यायालयाच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:13 PM

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सर्वपक्षीय संगनमताने स्थापन झालेल्या नंदुरबार जिल्हा परिषदेतील सत्तासंघर्ष अवघ्या आठ महिन्याच्या ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सर्वपक्षीय संगनमताने स्थापन झालेल्या नंदुरबार जिल्हा परिषदेतील सत्तासंघर्ष अवघ्या आठ महिन्याच्या आतच उफाळून आला असून हा वाद आता न्यायालयाच्या वाटेवर आहे़ त्यामुळे राजकीय चर्चेला नवे वळण लागले आहे़नंदुरबार जिल्हा परिषदेतील सत्तेचे समीकरण हे संपूर्ण महाराष्ट्रात वेगळे आहे़ जिल्हा परिषदेत काँग्रेसचे २४, भाजपाचे २३, शिवसेना ७ आणि राष्ट्रवादी २ असे उमेदवार निवडून आले आहेत़ जिल्ह्यातील राजकीय समीकरण पाहिले तर राज्याच्या महाविकास आघाडीचे नेमके उलटे आहे़ राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार आहे़ पण जिल्ह्यात मात्र विधानसभा निवडणूकीपूर्वीच झालेल्या उलथापालथीमुळे येथे काँग्रेसचे शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्याशी जमत नाही़ पण हायकमांडच्या आदेशाने आणि अंतर्गत राजकारणातील कलहाने नंदुरबार जिल्हा परिषदेवर कॉंग्रेस शिवसेनेची युती होवून सत्ता स्थापन झाली़ विशेष म्हणजे सभापती निवडीच्यावेळी असा खेळ खेळला गेला की, त्यात भाजपलाही एक सभापती द्यावे लागले़ त्यामुळे सर्वपक्षीय युतीची अनोखी सत्ता जिल्हा परिषदेत सध्या आहे़सभापती पदाच्या निवडीच्यावेळी शिवसेनेकडे उपाध्यक्षपद दिले पण त्यावेळी उपाध्यक्षांना कृषी व पशुसंवर्धन विभाग दिला गेला़ तर काँग्रेसने बांधकाम खाते आपल्याकडे ठेवले़ या खातेवाटपावरूनच सुरूवातीपासून शिवसेना नाराज होती़ तेव्हापासूनच अंतर्गत खदखद सुरू होती़ अखेर ३१ जुलैच्या सभेत खातेबदलाचा ठराव झाला़ त्यानुसार बांधकाम खाते काँग्रेसचे अभिजीत पाटील यांच्याकडून काढून ते शिवसेनेचे अ‍ॅड़ राम रघुवंशी यांच्याकडे देण्यात आले़ आणि राम रघुवंशी यांच्याकडील कृषी खाते अभिजीत पाटील यांना देण्यात आले़ खातेबदल होईपर्यंत जाहिर कुठलीही प्रतिक्रिया नव्हती़ विशेष म्हणजे ज्या दिवशी हा ठराव होता़ त्या दिवशी सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र जेवण केले़ त्यामुळे संगनमताने हा विषय झाल्याचे बाहेर संदेश गेला़ पण प्रत्यक्षात मात्र अंतर्गत खदखद वाढतच आहे़या प्रकरणात ज्यांच्याकडून बांधकाम खाते काढले गेले ते अभिजीत पाटील यांनी आपल्याला विश्वासात न घेता निर्णय झाल्याचे आता जाहिरपणे सांगू लागले आहेत़ नव्हे तर त्यांनी ज्या दिवशी सभा होती़ त्यादिवशी सभेतच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देवून पाच प्रश्न विचारले होते़ आणि ठरावाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते़ परंतु सभेत प्रत्यक्षात कुठलीही चर्चा न होता एकमताने निर्णय झाल्याचे सांगण्यात आले़ त्यालाच अभिजीत पाटील यांनी विरोध दर्शवला असून आपल्या प्रश्नांची उत्तरे अद्यापही मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे़ आपला विरोध असताना एक मताने ठराव झालाच कसा ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे़खातेबदलाची प्रक्रिया ही कायदेशीर असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी ती कायद्याला धरून नाही़ असाही आरोप आता अभिजीत पाटील यांच्या समर्थकांनी केला आहे़ त्यामुळे एकूणच राजकारणातील अंतर्गत खदखद वाढत आहे़ खातेबदलाचा निर्णयावर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एक असल्याचे चित्र असले तरी या नेत्यांच्या निर्णयालाच आता आव्हान देण्याची भूमिका अभिजीत पाटील यांनी घेतल्यामुळे सर्वांचेच लक्ष आता या घटनेकडे वेधले आहे़आपल्याकडील बांधकाम खाते आपल्याकडून का काढण्यात आले, ते आपल्याला अद्यापही माहित नाही़ वास्तविक हे खाते आपण सुरूवातीलाही मागितले नव्हते़ पण दिले तर मग अचानक आपल्याला विश्वासात न घेता बदलले कसे, आपण कामात कसूर केला असेल तर त्याबाबत विचारणाही झाली नाही़ आपण राजीनामाही दिला नाही़ जिल्हा परिषद अध्यक्षांना असा सभेत खातेबदलाचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही़ त्यामुळे या संदर्भात आपण न्यायालयात जाणार आहोत़ आपली ही भूमिका कुठल्याही नेत्याविरूध्द नाही़-अभिजीत पाटील, सभापती,कृषी व पशुसंवर्धन, नंदुरबाऱ