शहाद्यात चोरीच्या दुचाकी विक्री करणारा पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 11:56 IST2020-02-18T11:56:06+5:302020-02-18T11:56:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चोरीची दुचाकी विक्री करणाऱ्या मध्यप्रदेशातील एकास एलसीबीने अटक केली. त्याच्याकडून दोन चोरीच्या मोटरसायकली जप्त ...

Police traps for selling stolen bikes in Martyrs | शहाद्यात चोरीच्या दुचाकी विक्री करणारा पोलिसांच्या जाळ्यात

शहाद्यात चोरीच्या दुचाकी विक्री करणारा पोलिसांच्या जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : चोरीची दुचाकी विक्री करणाऱ्या मध्यप्रदेशातील एकास एलसीबीने अटक केली. त्याच्याकडून दोन चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान,महिनाभरात मोटरसायकल चोरट्या तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३५ पेक्षा अधीक वाहने जप्त करण्यात आली आहेत.
करणसिंग कलरसिंग डावर, रा.पिपलाघर, ता.नेवाली (मध्यप्रदेश) असे संशयीताचे नाव आहे. शहादा येथे महागडी मोटरसायकल कमी किंमतीत एकजण विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच गस्तीवर असलेल्या पथकाला सुचना दिल्या. पथकाने डोंगरगाव चौफुलीवर तपास केला असता तेथे एकजण संशयास्पदरित्या आढळून आला. त्याला हटकले असता त्याने मोटरसायकलीसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला झडप घालून पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव करणसिंग डावर असल्याचे सांगितले. सोबतची दुचाकी ही लंगडी भवानी येथील कन्हैय्यालाल जिवन पावरा यांची चोरल्याचे सांगितले. शिवाय शहादा शहरातून देखील एक दुचाकी चार महिन्यांपूर्वी चोरल्याची कबुली त्याने दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, उपनिरिक्षक योगेश राऊत, हवालदार दिपक गोरे, योगेश सोनवणे, विकास अजगे, विजय ढिवरे यांच्या पथकाने केली.

Web Title: Police traps for selling stolen bikes in Martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.