पोलीस अधिक्षकांकडून शहादा येथील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 12:58 IST2018-03-24T12:58:16+5:302018-03-24T12:58:16+5:30

पोलीस अधिक्षकांकडून शहादा येथील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 24 : रामनवमीच्या पाश्र्वभूमीवर शहरात विविध कार्यक्रम होणार आहेत़ यानिमित्त शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी घेतला़
रविवारी रामनवमीनिमित्त शहादा येथे विविध कार्यक्रम होणार आहेत़ यानिमित्त मोटारसायकल रॅलीसह इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आह़े कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस अधिक्षक संजय पाटील यांनी याठिकाणी भेट देत माहिती जाणून घेतली़ प्रसंगी शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी एम़बी़पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक एस़बी़ शिंदे आदी उपस्थित होत़े शहादा येथे हुतात्मा लालदास चौकालगतचे पुरातन राम मंदिर येथून रविवारी शोभायात्रा काढण्यात येणार आह़े गांधी चौक, गुजर गल्ली, संत सेना चौक, इकबाल चौक या मार्गाने जनता चौकात रामभक्त येतात़ दुपारी 12 वाजेपासून रात्री 10 र्पयत रामनवमीचा उत्सव होणार आह़े गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन विविध उपाययोजना करत आह़े रामनवमीनंतर हनुमान जयंती आणि महावीर जयंती उत्सव होणार आह़े