नगरसेवकाच्या अरेरावीबाबत पोलिसात निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:48 IST2019-11-08T12:48:26+5:302019-11-08T12:48:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पालिका अधिकारी व कर्मचा:यांशी अरेरावीची भाषा वापरुन विभाग प्रमुखांशी वाद घालून पैशांची मागणी करणा:या ...

नगरसेवकाच्या अरेरावीबाबत पोलिसात निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पालिका अधिकारी व कर्मचा:यांशी अरेरावीची भाषा वापरुन विभाग प्रमुखांशी वाद घालून पैशांची मागणी करणा:या येथील नगरसेवकाचा निषेध करीत शहादा पालिकेच्या अधिकारी व कर्मचा:यांनी गुरुवारी कामबंद आंदोलन केले. याबाबत शहादा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहादा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक शेख इक्बाल शेख सलीम यांनी 6 नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागातील स्वच्छता पर्यवेक्षक गफ्फार पिंजारी यांना फोन करून पाच हजार रुपयांची मागणी केली. तसेच मुख्याधिकारी राहुल बाबाजी वाघ व आरोग्य विभाग प्रमुख राजू महादू चव्हाण यांना ईल भाषेत शिवीगाळ केली. याबाबतची ध्वनिफीतही (सीडी) निवेदनासोबत सादर करण्यात आली आहे.
नगरसेवक शेख इक्बाल हे वारंवार कार्यालयात येऊन महिला कर्मचा:यांसमोर ईल भाषेत शिवीगाळ करतात. विद्युत, आरोग्य, बांधकाम या विभागात वारंवार तोंडी खोटय़ा तक्रारी करून माङो काम होत नाही असे म्हणत अधिकारी व कर्मचा:यांना अर्वाच्य भाषेत दमदाटी करून हाणामारी करण्याची व ‘मेरा कोण क्या कर लेगा’ अशी धमकी देतात. पालिकेचे कर्मचारी या नगरसेवकाच्या वागणुकीचा मानसिक त्रास सहन करीत असून कर्मचा:यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संबंधित नगरसेवक शेख इक्बाल शेख सलीम यांच्यावर जिल्हाधिकारी, यांच्याकडून तीन अपत्य असल्याबाबत नगरसेवक पद रद्द केल्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. परंतु संबंधित खात्याचे राज्यमंत्री यांच्याकडे याबाबतची सुनावणी पूर्ण होऊन शासनाकडून नगरसेवक पद रद्द होणेसंदर्भात निकाल प्रलंबित आहे. संबंधिताची सार्वजनिक ठिकाणी वर्तणूक व वागणूक अशोभनीय असून अशा प्रकारामुळे शहराची शांतता व सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी कर्मचा:यांतर्फे निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून संबंधितावर योग्य कारवाई करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. निवेदनावर पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, स्वच्छता निरीक्षक राजू चव्हाण, प्रशासकीय अधिकारी माधव गजरे, अभियंता संदीप टेंभेकर, पाणीपुरवठा अभियंता संदीप चौधरी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र सैंदाणे आदींच्या सह्या आहेत