मोलगी येथे पोलीस कर्मचा:याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 12:51 IST2018-03-07T12:51:01+5:302018-03-07T12:51:01+5:30

मोलगी येथे पोलीस कर्मचा:याला मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मोलगी ता़ अक्कलकुवा येथील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवणा:यास मज्जाव करणा:या पोलीस कर्मचा:याला एकाने मारहाण केल्याची घटना घडली़ सोमवारी दुपारी 12़3ं0 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़
मोलगी पोलीस ठाण्याचे कर्मचारी संदीप सदाराव यांची मोलगी येथे कोलपासू माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर नियुक्ती करण्यात आली होती़ याठिकाणी दहावीची परीक्षा सुरू असताना 12़30 वाजेच्या सुमारास अनिल खोजल्या वळवी रा़ दहेलचा माटय़ाबारीपाडा ता़ अक्कलकुवा हा कॉपी पुरवत असल्याचे लक्षात आल्याने पोलीस कर्मचारी सदाराव यांनी त्याला मज्जाव केला़ याचा राग आल्याने संशयित अनिल याने संदीप सदाराव यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली़ यादरम्यान त्याने पोलीस कॉन्स्टेबल सदाराव यांचा शासकीय गणवेश फाडून दुखापत केली़ तसेच अलि भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली़
संदीप सदाराव यांनी मोलगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अनिल वळवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ यावेळी परीक्षा केंद्राबाहेर बघ्यांची एकच गर्दी झाली होती़ दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अनिल वळवी यास माटय़ाबारीपाडा येथून सोमवारी पाच वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली़ सोमवारी 10 वीचा हिंदीचा पेपर होता़ शाळेच्या मागेल भिंतीजवळ बसून असलेल्या संशयित अनिल याच्याकडे प्रश्नपत्रिकेच्या चार ङोरॉक्स आढळून आल्यानंतर पोलीस कर्मचारी सदाराव यांनी मज्जाव केला होता़