तळोदा येथे पोलिसांचे पथसंचलन व प्रात्यक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:50 IST2020-08-29T12:49:54+5:302020-08-29T12:50:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून शहरातील विविध भागातून पथसंचलन करण्यात आले. तळोदा शहरातील ...

तळोदा येथे पोलिसांचे पथसंचलन व प्रात्यक्षिके
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून शहरातील विविध भागातून पथसंचलन करण्यात आले.
तळोदा शहरातील संविधान चौक, स्मारक चौक, मारुती मंदिर, कालिका माता मंदिर, मराठा चौक, शनिगल्ली, पोस्टगल्ली, कुंभारवाडा, इलाही चौक, खाज्या नाईक चौक, बसस्थानक व परत पोलीस स्टेशन या मार्गाने पोलिसांचे पथसंचलन करण्यात आले. पथसंचलनात उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तळोद्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे, अभय मोरे आदींसह ६२ पोलीस कर्मचारी, ४९ होमगार्ड व पाच वाहने सहभागी झाले होते.
पथसंचलनादरम्यान स्मारक चौक, भाजी मार्केट व बसस्थानकासमोरील भाजी मार्केट येथे दंगा काबू योजना व मॉकड्रीलचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या या प्रात्यक्षिकांनी उपस्थितीतांचे लक्ष वेधून घेतले होते.