प्रकाशा येथे तापीकाठावर पोलिसांचा चोख पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 12:49 IST2020-08-30T12:49:17+5:302020-08-30T12:49:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा, ता.शहादा येथील तापी घाटावर गणेश विसर्जनासाठी बंदी असताना याठिकाणी कोणीही गणेश विसर्जनासाठी येऊ ...

प्रकाशा येथे तापीकाठावर पोलिसांचा चोख पहारा
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : प्रकाशा, ता.शहादा येथील तापी घाटावर गणेश विसर्जनासाठी बंदी असताना याठिकाणी कोणीही गणेश विसर्जनासाठी येऊ नये यासाठी पोलिसांनी बॅरिकेट्स लावून कडक बंदोबस्त ठेवला आहे. कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता प्रकाशा येथे गणेश भक्तांनी येऊ नये असा फलकदेखील लावण्यात आला आहे.
याबात असे की, प्रकाशा येथील तापी व गोमाई नदीला मुबलक पाणी असून, संगमेश्वर परिसरातदेखील तापी दुथडी भरून वाहत आहे. तसेच या ठिकाणी लाकडी बोट असल्याने भाविकांना गणेश विसर्जनासाठी सोयीचे होते. त्यामुळे प्रकाशा पंचक्रोशीतील भाविक व शहादा, नंदुरबार, तळोदा, या तालुक्यातील लहान-मोठे गणपती विसर्जनासाठी प्रकाशा येथे येत असता. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची परिस्थिती पाहता जिल्ह्यात रूग्ण संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यात प्रकाशा गावातदेखील रूग्ण संख्या वाढत असल्याने प्रकाशा ग्रामपंचायतीने ठराव करून तापी घाटावर मूर्ती विसर्जनाला बंदी घातली आहे. तसे फलक व जनजागृतीदेखील केली जात आहे. म्हणून शहादा पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश वाघ यांच्यासह पोलीस कर्मचारी, महिला पोलीस, होमगार्ड आदींनी केदारेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावरच बॅरिकेट्स लावून कर्मचारी उभे आहेत.
पाचव्या दिवशीदेखील याठिकाणी बंदोबस्त होता. तोच बंदोबस्त सातव्या दिवशीदेखील होता. आता नवव्या आणि अनंत चतुर्दशीला अशीच परिस्थिती आणि कडक बंदोबस राहणार आहे. म्हणून कोणीही भाविक तापी नदीपर्यंत जाऊ शकणार नाही. तेव्हा नंदुरबार जिल्ह्यातील गणेश भक्तांनी प्रकाशा येथे विसर्जनासाठी येऊ नये, असे आव्हान प्रकाशा ग्रामपंचायत व प्रकाशा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
कोविड- १९ चा प्रसार होऊ नये म्हणून प्रकाशा ग्रामपंचायतीने हा ठराव केला आहे. गर्दी होऊ नये, एकत्र येऊ नये व कोरोनाच्या फैलाव होऊ नये हाच त्या मागचा उद्दिष्ट आहे.
नवव्या व अंतिम दिवशाच्या ‘श्रीं’च्या विसर्जनासाठी प्रकाशा येथे बंदी असल्याने प्रकाशा येथील तापी नदीच्या पात्रावर कोणत्याही मंडळाने अथवा भाविकाने येवू नये, असे आवाहन प्रकाशा पोलीस दूरक्षेत्रातर्फे करण्यात आले आहे. तरी गणेश भक्तांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.
-नीलेश वाघ, सहायक पोलीस निरीक्षक