मतदानाच्या पार्श्वभूमीवर तळोद्यात पोलिसांचे पथसंचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST2021-01-10T04:24:11+5:302021-01-10T04:24:11+5:30
तळोदा तालुक्यातील बंधारा, राणीपूर, पाडळपूर, सरदार नगर, रोझवा, रेवानगर, नर्मदानगर अशा सात ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. येत्या १५ ...

मतदानाच्या पार्श्वभूमीवर तळोद्यात पोलिसांचे पथसंचलन
तळोदा तालुक्यातील बंधारा, राणीपूर, पाडळपूर, सरदार नगर, रोझवा, रेवानगर, नर्मदानगर अशा सात ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. येत्या १५ जानेवारी रोजी या ग्रामपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या वतीने मतदान होत असलेल्या ग्रामपंचायतच्या गावामध्ये पंथसंचलन करण्यात आले. शहरातील स्मारक चौकापासून संचलनाची सुरुवात करण्यात आली. पुढे स्मारक चौकमार्गे हनुमान मंदिर, मोठी गल्ली, कालिका देवी गल्ली, मराठा चौक, काकाशेठ गल्ली, खान्देशी गल्ली, कुंभारवाडा, ख्वाजा नाईक चौक, बस स्टँड तेथून परत पोलीस ठाणे आदी परिसरात संचलन करण्यात आले. या वेळी पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक नंदराज पाटील, पोलीस उपनिरीक्षक अविनाश केदार, अभय मोरे, पोलीस हवालदार अजय पवार, रवींद्र कोराळे, युवराज चव्हाण, अजय कोळी आदीसह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते. या पथसंचलनात नंदुरबार मुख्यालयातून ६२ पोलीस कर्मचारी, तळोदा येथील ४० पोलीस कर्मचारी, हॊमगार्ड पथक, बँड पथक आदींचा या पथसंचलनात सहभाग होता.