पोलीस अधिकारीही कोरोनाच्या कचाट्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 12:19 IST2020-09-08T12:19:28+5:302020-09-08T12:19:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार शहरातील चार पोलीस ठाण्यांपैकी तीन पोलीस ठाण्यातील तीन प्रमुख अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली ...

पोलीस अधिकारीही कोरोनाच्या कचाट्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार शहरातील चार पोलीस ठाण्यांपैकी तीन पोलीस ठाण्यातील तीन प्रमुख अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याच पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी देखील बाधीत झाले आहेत. त्यामुळे पोलीस वर्तूळात चिंता व्यक्त केली जात आहे.
कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शहरासह ग्रामिण भागात देखील या आजाराने थैमान घातले आहे. आता पोलिसांना देखील या आजाराने ग्रासले आहे. सुरुवातीला पोलीस विभाग त्यापासून लांब होता. आता पोलीस देखील त्याच्या विळख्यात येत आहे. नंदुरबार शहरातील चार पोलीस ठाण्यापैकी तीन पोलीस ठाण्यातील प्रमुख अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. त्यात शहर पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखा पोलीस ठाण्याचा त्यात समावेश आहे.
हे अधिकारी उपचार घेत असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यापासून लांब होते. मोलगी पोलीस ठाण्याचा अपवाद वगळता इतर सर्व पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेत कोरोनापासून दूर राहणे पसंत केले होते. परंतु गेल्या महिनाभरात झालेल्या विविध सण, उत्सवांच्या काळात बंदोबस्ताचा वाढलेला ताण आणि या काळात जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येण्यामुळे आता पोलीस अधिकारी व कर्मचारी देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याचे चित्र आहे. असे असले तरी इतर जिल्ह्यांच्या तुुलनेत नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना बाधीत पोलीस कर्मचाºयांची संख्या अगदीच नगण्य म्हणता येईल.