शहाद्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांना मिळाले घबाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:57 AM2020-09-24T11:57:12+5:302020-09-24T11:57:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : येथील दोंडाईचा रोडवरील मोहिदा शिवारातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड ...

Police found ghabad at a gambling den in Shahada | शहाद्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांना मिळाले घबाड

शहाद्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांना मिळाले घबाड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : येथील दोंडाईचा रोडवरील मोहिदा शिवारातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. धाडीत तब्बल १३ लाख एक हजार रुपये रोख तसेच १४ चार चाकी वाहने, आठ मोटार सायकली, ४५ मोबाईल असा एकुण सुमारे ७८ लाख १६ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ४३ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहाद्यात आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जुगार आहे. नुकतेच येऊन गेलेले नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक यांनी अवैध धंदे बंद करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार कारवाईचेही बजावले होते. त्यानुसार पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाया केल्या, परंतु एवढी मोठी कारवाई आतापर्यंत कुठेच झाली नव्हती. शिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहने देखील आतापर्यंत जप्त झालेली नव्हती.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, परिविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक सुनिल साळुखे , उपनिरिक्षक विक्रांत कचरे , कैलास माळी , उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी भगवान सावळे , गणेश सावळे , रविंद्र सपकाळे , योगेश खेळकर , निखील ठाकरे , मकसुद पठाण , किरण भील , दिपक मालचे , महेंद्र शिंदे , चालक साळवे , चालक सचिन पॉल, चालक मराठे, अमरसिंग वळवी यांच्या पथकाने केली.
तपास परिविक्षाधिन पोलीस उप अधिक्षक, सुनिल साळुखे व सहायक पोलीस निरिक्षक भगवान कोळी करत आहेत.


कारवाईत नंदुरबार, तळोदा, साक्री, शिंदखेडा, दोंडाईचा व शहादा येथील नागरिकांसह मध्यप्रदेशातील व्यावसायिकांचा समावेश असल्याने व सर्वाधिक आरोपी हे मध्यप्रदेशातील असल्याने या अड्ड्याची ख्याती किती होती याबाबत अंदाज येतो. विशेष म्हणजे पोलिसांनी धाड टाकल्यानंतर येथे सुमारे ७० ते ८० लाख रुपये रोख रक्कम जप्त केल्याची चर्चा संपूर्ण शहरात होती. पोलिसांनी तीन गोण्यांमध्ये सदर पैसे भरुन पोलीस ठाण्यात आणले तेथे या सर्व पैशाची मोजणी करण्यात आली पैसे मोजण्यासाठी मशिन ही मागविण्यात आले होते. मोजणीनंतर ती रक्कम १३ लाख एक हजार रुपये भरली.

शहादा पोलिसांना माहिती नाही?
मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता या अड्ड्यावर धाड टाकली.रकमेची मोजणी करण्यासाठी व आरोपींना अटक करून शहादा पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यासाठी सुमारे बारा तास सलग पोलीस कारवाई सुरु होती. या बारा तासात धाड टाकणारे सर्व अधिकारी व कर्मचारी बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पैशांची मोजणी करून गुन्हा नोंदणी करण्याचे काम करत होते. या ठिकाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम व पथकाला मिळाली मात्र ज्या शहादा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदर परिसर येतो त्या पोलिस ठाण्याला या याबाबत तसेच उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने टाकलेल्या धाडी बाबत कुठलीच माहिती नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Police found ghabad at a gambling den in Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.