शहाद्यात वेश्यागृहावर पोलीसांची धाड
By Admin | Updated: January 10, 2017 20:39 IST2017-01-10T20:39:18+5:302017-01-10T20:39:18+5:30
जिल्ह्यातील शहादा येथील नव्या भाजीपाला मार्केट लगतच्या झोपड्यांमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायाची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी त्याठिकाणी धाड टाकत ७०

शहाद्यात वेश्यागृहावर पोलीसांची धाड
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 10 - जिल्ह्यातील शहादा येथील नव्या भाजीपाला मार्केट लगतच्या झोपड्यांमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायाची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी त्याठिकाणी धाड टाकत ७० महिलांना ताब्यात घेत कारवाई केली़ यावेळी पोलीसांच्या हाती २५ शौकीन युवक लागले़ यातील काही विद्यार्थी गणवेशात होते़
पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांना शहादा शहारातील बाजारपेठेत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती़ याबाबत त्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी लतीफ तडवी, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक निलिमा सातव यांना माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते़ यानुसार मंगळवारी दुपारी दीड वाजेपासून कारवाई करण्यास सुरूवात करण्यात आली़ पोलीस उपनिरीक्षक निलिमा सातव आणि महिला पोलीसांकडून बाजारपेठेलगतच्या झोपड्यांमधून युवती आणि महिलांवर कारवाई करण्यात आली़ अचानक झालेल्या कारवाईमुळे यावेळी पळापळ झाली, मात्र बाजारपेठेलगत साध्या वेशात असलेल्या पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले़ ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांना शहादा पोलीस ठाण्यात घेऊन पोलीसांनी त्यांची माहिती काढत न्यायालयासमोर हजर केले़ पोलीसांकडून याठिकाणी सुरू असलेला वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या दोन महिलांवर पिटाअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे़
पोलीस ठाण्यात कारवाई सुरू असताना काही राजकीय पुढारी, दलाल यांच्याकडून सेटींग करण्याचा प्रयत्न सुरू होता़ ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन युवकांच्या पालकांना बोलावून त्यांना समज देण्यात आली़ हे विद्यार्थी शहादा शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या गणवेशात असल्याने पोलीसांनी त्यांना केवळ समज दिली़
- पोलीसांनी याठिकाणाहून ८० महिलांना ताब्यात घेतले होते़ मात्र यातील ७० देहविक्री करणाऱ्या असल्याचे निष्पन्न झाले़ ताब्यात घेतलेल्या ७० महिलांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यातील सात युवती अल्पवयीन असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली़ यावेळी २० शौकिन युवकांनाही यांना न्यायालयात आणण्यात आले होते़ न्यायालयाने महिला व अल्पयवयीन युवतींना शहादा तालुक्यातील जयनगर येथील महिला सुधारगृहात दाखल करण्याचे आदेश दिले तर, सापडलेल्या २० शौकिनांना १२०० रूपयांपर्यंत दंड आकारण्याची शिक्षा दिली आहे़