युवतीस पळवून नेल्याप्रकरणी युवकास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:32 IST2019-12-30T12:31:59+5:302019-12-30T12:32:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : अल्पवयीन मुलीला विवाहाचे अमिष देऊन फूस लावून पळवून नेत शारिरिक अत्याचार केल्याप्रकरणी असलोद येथील ...

युवतीस पळवून नेल्याप्रकरणी युवकास पोलीस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : अल्पवयीन मुलीला विवाहाचे अमिष देऊन फूस लावून पळवून नेत शारिरिक अत्याचार केल्याप्रकरणी असलोद येथील युवकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़ त्याला न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
२३ नोव्हेंबर रोजी कवठळ ता़ शहादा येथील १४ वर्षीय मुलीला न्यू असलोद येथील गणेश भगवान साळूंखे याने पळवून नेले होते़ याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा होता़ पोलीसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता़ संशयित गणेश हा युवतीसोबत गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यात ऊसतोड कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली होती़ याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत व कर्मचाऱ्यांनी तेथे भेट देत युवतीसह ताब्यात घेत शहाद्यात आणले होते़ गणेश साळूंखे विरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता़