दरोड्यातील संशयीतास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:36 IST2020-08-21T12:36:00+5:302020-08-21T12:36:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील दरोडयाचा बनाव करणाऱ्या संशयीतास पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, फरार ...

दरोड्यातील संशयीतास पोलीस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील दरोडयाचा बनाव करणाऱ्या संशयीतास पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, फरार तिघांच्या शोधासाठी दोन पथके गुजरात आणि राजस्थानला रवाना करण्यात आले आहेत.
डीसी डेव्हलपर्सच्या दरोड्यातील घटनेत अटक करण्यात आलेला उमेदसिंग यास न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी दिली. फरार झालेल्या तिघांच्या शोधासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी दोन पथके राजस्थान आणि गुजरातला रवाना करण्यात आली आहेत. तिघे सराईत असल्याचे समजते.