शहरातील जुगार अड्डय़ावर पोलीसांची धडक कारवाइ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:36 IST2019-09-27T12:36:20+5:302019-09-27T12:36:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील राजपूत पेट्रोलपंप भागात बंद घरात सुरु असलेल्या जुगार अड्डय़ावर पोलीसांनी धाड टाकून पाच ...

शहरातील जुगार अड्डय़ावर पोलीसांची धडक कारवाइ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील राजपूत पेट्रोलपंप भागात बंद घरात सुरु असलेल्या जुगार अड्डय़ावर पोलीसांनी धाड टाकून पाच जणांना ताब्यात घेतल़े बुधवारी सायंकाळी पोलीसांनी ही कारवाई केली़
राजपूत पेट्रोलपंपासमोर पत्र्याच्या बंद घरात अवैधरित्या जुगार सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक किरण पवार यांना मिळाली होती़ त्यांनी पोलीस पथकासह याठिकाणी धाड टाकली असता त्याठिकाणी कृष्णा आप्पा पेंढारकर, पुनीलाल सुकलाल भोई, भिका पांडुरंग चौधरी, वामन नथ्थू भोई, राजू मगन भिल हे तीन पत्तीचा डाव खेळत असल्याचे दिसून आल़े संशयितांना ताब्यात घेत पोलीसांनी त्यांच्याकडून 5 हजार 70 रुपये रोख जप्त केल़े त्यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन जुगार कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली़
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधिक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, गुन्हे शोध पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण सैंदाणे, शैलेंद्र माळी, रमेश साळूंके, गोकुळ बंजारा, रामेश्वर चव्हाण यांनी केली़