शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

जुगार खेळणाऱ्या प्रतिष्ठिताना पोलिसांकडून चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 12:18 PM

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील बसस्थानक परिसरातील एका किराणा दुकानाच्या माज घरात पत्ते खेळणाºया प्रतिष्ठितांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कखापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील बसस्थानक परिसरातील एका किराणा दुकानाच्या माज घरात पत्ते खेळणाºया प्रतिष्ठितांना खापर औट पोस्टच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगलाच चोप दिला. याप्रसंगी त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम ताब्यात घेऊन त्यांना सोडून देण्यात आल्यामुळे गावात चांगलीच खमंग चर्चा सुरू होती.याबाबत असे की, येथील एका किराणा दुकानदाराकडे अनेक प्रतिष्ठितांची उठबस असून, दुकानाच्या पुढच्या भागात किराणा सामान विक्रीसाठी ठेवण्यात आलेला आहे तर दुकानाचा मागच्या भागात गेल्या अनेक दिवसापासून गावातील प्रतिष्ठित पत्ते खेळत असल्याची कुणकुण पोलिसांना होती. त्यातून ९ जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोन पोलीसांनी पुढच्या भागातून दुकानात प्रवेश केला तर दोन पोलिसांनी दुकानाच्या मागच्या भागातून प्रवेश करून या पत्ते खेळणाºयांना पळून जात असताना पकडून चांगलाच चोप दिल्याचे कळते.यातील तीन ते चार इसम व्यापारी व दोन शिक्षक असल्याचे समजते. हे प्रकरण पुढे वाढू नये म्हणून यातील सर्वांनी पोलिसांचे हात जागेवरच ओले केल्याची चर्चा असून, ज्या दुकानात हे सुरु होते त्याच्याकडूनही मोठी रक्कम स्थानिक पोलिसांनी घेतल्याची चर्चा गावभर सुरू होती.सध्या कोरोना महामारीचे संकट देशात थैमान घालत असताना शासन व प्रशासन नागरीकाना एकत्र येऊ नका असे आवाहन वारंवार करीत असताना अश्या प्रकारे एकत्रित येऊन अवैध व अनैतिक काम करणाºया लोकाना शिक्षा लागणे गरजेचे असताना पोलिसांनी त्यांना सोडून दिल्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण होत असून, वरिष्ठांनी याची दखल घेण्याची मागणी आहे.सध्या खापर परिसरात पोलिसांच्या डोळ्यादेखत गुटखा पुड्यांची सर्रास विक्री होत असून, अनेक किराणा दुकानदार बंदी असलेला गुटखा गुजरातेतून मागवून मोठ्या प्रमाणावर विक्री करीत आहेत ते कोण दुकानदार आहेत त्यांच्याकडे संबंधित कर्मचारी दरमहा वसुलीसाठी जात असल्याचीदेखील गावभर चर्चा सुरू असून, याचीही दखल घेण्याची मागणी जनतेतून होत आहे.