जुगार खेळणाऱ्या प्रतिष्ठिताना पोलिसांकडून चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:18 IST2020-07-12T12:18:03+5:302020-07-12T12:18:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील बसस्थानक परिसरातील एका किराणा दुकानाच्या माज घरात पत्ते खेळणाºया प्रतिष्ठितांना ...

जुगार खेळणाऱ्या प्रतिष्ठिताना पोलिसांकडून चोप
लोकमत न्यूज नेटवर्क
खापर : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील बसस्थानक परिसरातील एका किराणा दुकानाच्या माज घरात पत्ते खेळणाºया प्रतिष्ठितांना खापर औट पोस्टच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगलाच चोप दिला. याप्रसंगी त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम ताब्यात घेऊन त्यांना सोडून देण्यात आल्यामुळे गावात चांगलीच खमंग चर्चा सुरू होती.
याबाबत असे की, येथील एका किराणा दुकानदाराकडे अनेक प्रतिष्ठितांची उठबस असून, दुकानाच्या पुढच्या भागात किराणा सामान विक्रीसाठी ठेवण्यात आलेला आहे तर दुकानाचा मागच्या भागात गेल्या अनेक दिवसापासून गावातील प्रतिष्ठित पत्ते खेळत असल्याची कुणकुण पोलिसांना होती. त्यातून ९ जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दोन पोलीसांनी पुढच्या भागातून दुकानात प्रवेश केला तर दोन पोलिसांनी दुकानाच्या मागच्या भागातून प्रवेश करून या पत्ते खेळणाºयांना पळून जात असताना पकडून चांगलाच चोप दिल्याचे कळते.
यातील तीन ते चार इसम व्यापारी व दोन शिक्षक असल्याचे समजते. हे प्रकरण पुढे वाढू नये म्हणून यातील सर्वांनी पोलिसांचे हात जागेवरच ओले केल्याची चर्चा असून, ज्या दुकानात हे सुरु होते त्याच्याकडूनही मोठी रक्कम स्थानिक पोलिसांनी घेतल्याची चर्चा गावभर सुरू होती.
सध्या कोरोना महामारीचे संकट देशात थैमान घालत असताना शासन व प्रशासन नागरीकाना एकत्र येऊ नका असे आवाहन वारंवार करीत असताना अश्या प्रकारे एकत्रित येऊन अवैध व अनैतिक काम करणाºया लोकाना शिक्षा लागणे गरजेचे असताना पोलिसांनी त्यांना सोडून दिल्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण होत असून, वरिष्ठांनी याची दखल घेण्याची मागणी आहे.
सध्या खापर परिसरात पोलिसांच्या डोळ्यादेखत गुटखा पुड्यांची सर्रास विक्री होत असून, अनेक किराणा दुकानदार बंदी असलेला गुटखा गुजरातेतून मागवून मोठ्या प्रमाणावर विक्री करीत आहेत ते कोण दुकानदार आहेत त्यांच्याकडे संबंधित कर्मचारी दरमहा वसुलीसाठी जात असल्याचीदेखील गावभर चर्चा सुरू असून, याचीही दखल घेण्याची मागणी जनतेतून होत आहे.