मानसिक त्रासामुळे पत्नीचे विष प्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 12:36 IST2020-09-09T12:36:06+5:302020-09-09T12:36:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुसरी पत्नी करून आणणार म्हणून पत्नीला वारंवार मानसिक त्रास दिल्याने पत्नीने विष पिऊन आत्महत्या ...

Poisoning of wife due to mental distress | मानसिक त्रासामुळे पत्नीचे विष प्राशन

मानसिक त्रासामुळे पत्नीचे विष प्राशन


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुसरी पत्नी करून आणणार म्हणून पत्नीला वारंवार मानसिक त्रास दिल्याने पत्नीने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना नंदुरबारातील जगतापवाडी भागात घडली. याबाबत पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रताप वनकर पावरा, रा.राडीकलम, ता.धडगाव असे संशयीताचे नाव आहे. तर गोटीबाई प्रताप पावरा (३०) रा.राडीकलम, हल्ली मुकाम जगतापवाडी, नंदुरबार असे मयताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, मुळकचे राडीकलम येथील व सद्या नंदुरबार येथील जगतापवाडी भागात राहणारे प्रताप वनकर पावरा यांचे गोटीबाई यांच्याशी दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. परंतु प्रताप यांच्या मनात दुसरी पत्नी करण्याचा घाटत होते. ते नेहमीच पत्नीला दुसरी पत्नी करून आणणार असे सांगून मानसिक त्रास देत होते.
त्या त्रासामुळे गोटीबाई या मानसिक तणावाखाली राहत होत्या. सवत येणार, आपले काय होणार या विवंचनेत असणाऱ्या गोटीबाई यांनी रविवारी रात्री घरातच विष पिऊन आत्महत्या केली.
सकाळी ही बाब उघडकीस आल्यानंतर मयत गोटीबाई यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेतांना त्यांचा मृत्यू झाला. मयताचे काका भरत वारसिंग पावरा, रा.सावºया दिगर, ता.धडगाव यांना संशय आल्याने त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली.
आपल्या पुतणीला प्रताप पावरा याने दुसरी पत्नी आणणार म्हणून मानसिक त्रास दिल्यानेच तिने आत्महत्या केल्याची फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून प्रताप यांच्या विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पोलीस निरिक्षिक नितीन चव्हाण करीत आहे. संशयीतला लवकरच ताब्यात घेणार असल्याचे नितीन चव्हाण यांनी सांगितले.
 

Web Title: Poisoning of wife due to mental distress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.