अधिकाऱ्याला खिसेकापूचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 12:39 IST2020-11-12T12:39:26+5:302020-11-12T12:39:36+5:30

  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  बसमध्ये चढत असतांना खिसेकापूने येथील बालविकास प्रकल्प अधिकारीचे पाकिट मारल्याची घटना नंदुरबार बसस्थानकात ...

Pocket blow to the officer | अधिकाऱ्याला खिसेकापूचा झटका

अधिकाऱ्याला खिसेकापूचा झटका

  लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  बसमध्ये चढत असतांना खिसेकापूने येथील बालविकास प्रकल्प अधिकारीचे पाकिट मारल्याची घटना नंदुरबार बसस्थानकात घडली. २० हजार रुपये रोख आणि महत्वाचे दस्ताऐवज त्यात होते.
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी अभिजीत अरुण मोलाणे हे नंदुरबार येथे मंगळवारी बैठकीसाठी आले होते. बैठक आटोपून ते धुळे येथे जाण्यासाठी सायंकाळच्या नंंदुरबार-पंढरपूर बसमध्ये चढत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन खिसेकापूने त्यांच्या पॅण्टच्या खिशातील पाकीट अलगद चोरले. मोलाणे हे बसमध्ये बसल्यावर त्यांना आपले पाकिट मारले गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने शोधाशोध केली, परंतु उपयोग झाला नाही. पाकिटात २० हजार रुपये रोख, विविध ओळखपत्रे होती. 
याबाबत त्यांनी सायंकाळी उशीरा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार ईशी करीत आहे. 

Web Title: Pocket blow to the officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.