मंदाणे ते भमराटानाका रस्त्याची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:21+5:302021-05-28T04:23:21+5:30
शहादा ते मालकातर या राज्य मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे मंदाणे, वडगाव, शहाणा या परिसरातून जाणाऱ्या या ...

मंदाणे ते भमराटानाका रस्त्याची दुर्दशा
शहादा ते मालकातर या राज्य मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे मंदाणे, वडगाव, शहाणा या परिसरातून जाणाऱ्या या मार्गावर वाहनांची वाढली आहे. मंदाणे येथून पुढे शिरपूर तालुक्यातील बोराडीकडे जाणारा हा रस्ता मध्य प्रदेशातील भमराटनाक्याकडे वळतो. यामुळे हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सोयीस्कर ठरत आहे. परंतु मंदाणे ते मध्य प्रदेश राज्य सीमेपर्यंतच्या भमराटानाकापर्यंत खड्डेच खड्डे पडले आहेत. साईड पट्टीही खोल असल्याने वाहनांना एकमेकांना साईड देताना मोठे कसरतीचे ठरते. त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघातही घडले असून काहींना जीवही गमवावा लागला आहे. हा रस्ता राज्य सीमेला जोडणारा रस्ता असल्याने मध्य प्रदेशाकडे जाणारी असंख्य वाहने येथून मार्गस्थ होतात. वाहनांची वाढती संख्या पाहता, प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करणे गरजेचे असतानाही कारवाई झालेली नाही. पानसेमल, सेंधवा, इंदूर, बडवाणी, खरगोन या मध्य प्रदेशातील प्रमुख शहरांकडे जाणारी वाहनेही या मार्गाने जात असल्याने रस्ता दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षा आहे. बांधकाम विभागाने या प्रकाराची दखल घेत तातडीने नूतनीकरण करून रस्ता दहा मीटरपर्यंत रुंद करावा, अशी मागणी आहे.