उच्च आवाजात डीजे वाजविणा:यांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 12:15 IST2019-09-05T12:15:38+5:302019-09-05T12:15:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डीजे व वाद्याचा मर्यादेपेक्षा अधीक आवाज करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी नंदुरबारातील दोन सार्वजनिक ...

उच्च आवाजात डीजे वाजविणा:यांवर गुन्हे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : डीजे व वाद्याचा मर्यादेपेक्षा अधीक आवाज करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी नंदुरबारातील दोन सार्वजनिक मंडळांच्या पदाधिका:यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यापुढेही या आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.
गणपती स्थापना मिरवणुकीत कायद्याच्या मानकापेक्षा अधीक तीव्रतेच्या आवाजात वाद्य व डिजे वाजविण्यास बंदी आहे. नंदुरबारात ही मर्यादा दोन मंडळांनी तोडली. त्यामुळे पोलिसांनी स्वत: सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 2 रोजी सायंकाळी साडेसात वाजता म.गांधी पुतळ्याजवळ आणि दोशाह तकिया भागात सव्वानऊ वाजता या मर्यादेचा भंग झाल्याचे पोलिसांनी फिर्यादीत म्हटले आहे. पहिली फिर्याद फौजदार सुनील बि:हाडे यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून सुमित राजपाल, रा.सिंधी कॉलनी, खंडू भाईदास माळी व भूषण गोरख गवळी रा.माळीवाडा यांच्याविरुद्ध तर दुसरी फिर्याद फौजदार बि:हाडे यांनीच दिली. त्यावरून विक्की बालाजी चौधरी, किरण राजेंद्र बडगुजर रा.अमर कॉलनी, संजय उत्तम मराठे रा.सिद्धी विनायक चौक, नंदुरबार यांच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि इतर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास पोलीस निरिक्षक नंदवालकर करीत आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी सांगितले, यापुढे देखील या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. अशा प्रकारामुळे ध्वनी प्रदुषण होऊन सार्वजनिक शांततेचा भंग होतो. तसेच डीजे सिस्टिीमवरून उच्च आवाजात गाणी वाजविल्यामुळे वृद्ध इसम, आजारी व्यक्ती, लहान बालके यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊन सार्वजनिक सुरक्षिततेचा व शांततेचा भंग होतो. त्यामुळे सर्व गणेश मंडळ आणि इतर मिरवणुका काढणा:यांनी याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील पंडित यांनी केले.
ध्वनी प्रदुषण अधिनियमाचे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा कलम 15 प्रमाणे पाच वर्ष कैद किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. गणेशोत्सव काळात कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ, करमवणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा उपयोग मर्यादेपेक्षा मोठय़ा आवाजात करू नये. तसे झाल्यास नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.