सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत घडताहेत खेळाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 12:52 IST2020-08-29T12:52:04+5:302020-08-29T12:52:13+5:30
भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तब्बल चार महिने सुरू राहिलेल्या लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रांवर परिणाम झाला आहे़ ...

सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत घडताहेत खेळाडू
भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तब्बल चार महिने सुरू राहिलेल्या लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रांवर परिणाम झाला आहे़ यात क्रीडा क्षेत्राचा समावेश असून गेल्या महिन्यापासून खेळाडू मैदानांवर सरावांसाठी येऊ लागले असल्याचे चित्र दिसू लागले आहे़ दरम्यान हा सराव सुरू असला तो सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व शासनाचे नियमांचे पालन करुनच होत आहे़
मार्च महिन्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली त्यावेळी जिल्ह्यातील विविध भागात छोट्या मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार होते़ लॉकडाऊनमुळे या स्पर्धाही रद्द करुन संसर्ग रोखण्यासाठी ग्राउंडवर खेळाडूंना सराव करण्यास मनाई करण्यात आली होती़ यानंतर स्पर्धाही रद्द करण्यात आल्या़ शालेय ते राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा रद्द झाल्याने शहरातील स्पोर्टस क्लबचे सरावही बंद झाले होते़ तब्बल चार महिने बंद असलेले सरावर गेल्या महिन्याच्या मध्यापासून पूर्ववत झाल्याचे सांगण्यात आले आहे़ १ आॅगस्टपासून खेळाडू केवळ सायंकाळी येत असल्याने मैदानांवर वर्दळ दिसून येत आहे़ ४दरम्यान जिल्ह्यातील काही गुणवंत खेळाडूंसोबत संपर्क केला होता़ यातील राष्ट्रीय स्पर्धेत उंच उडीत सुवर्ण पदक प्राप्त करणारा अभय गुरव हा खेळाडू मिलीटरी स्पोर्टस क्लब पुणे येथे सराव करत आहे़ नुकताच तो पुणे येथे रवाना झाला होता़ खेळाडूंनी स्वत:ची क्षमता वाढवण्यासाठी आत्मविश्वासाने पुढील काळात स्पर्धा कराव्यात, असे त्याने सांगितले़
४जिल्ह्यातील विविध भागातील खेळाडू नंदुरबार, नाशिक, पुणे येथे सराव करत स्पर्धांसाठी स्वत:ला सज्ज करत आहेत़ ४नंदुरबार शहरातील जी़टी़पाटील महाविद्यालय, यशवंत विद्यालयाचे क्रीडांगण, जिजामाता फार्मसी कॉलेजचे मैदान आणि जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडू पहाटे आणि सायंकाळी हजेरी लावत आहेत़ त्यांच्याकडून नियमित व्यायाम करण्यात आल्यानंतर आपआपल्या खेळांचा सराव सुरू करण्यात येतो़
४यशवंत विद्यालयाच्या मैदानात सायंकाळी आबाजी स्पोर्टस क्लबच्या खेळाडूंकडून टप्प्याटप्प्याने सोशल डिस्टन्सिंग ठेवत सराव केला जातो़ जीटीपी ग्राउंडवरही हेच दिसून येते़ दरम्यान काही खेळाडूंसोबत संवाद साधला असता, त्यांनी जिल्हा क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक निर्माण करण्याची मागणी केली़ राज्यात सर्वत्र सिंथेटीक ट्रॅक आहेत़ धावण्याच्या स्पर्धेला गेल्यानंतर अडचणी येत असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली़
शहरी भागात चार महिने खेळाडू घरात होते़ ग्रामीण भागात खेळाडू सराव करत होते़ परंतु या सर्वांनाच मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांच्या परफॉर्मन्सवर परिणाम झाला आहे़ आता खेळाडू येऊ लागले आहेत़ त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहे़ खेळाडूंची शारिरिक क्षमता ही कायम चांगली असते़ यातून ट्रॅकवर पुन्हा खेळाडू येऊ लागले असल्याचा आनंद आहे़
-प्रा़डॉ़मयूर ठाकरे,
क्रीडा मार्गदर्शक, नंदुरबाऱ
ग्राउंड बंद असल्याने रग्बी आणि हॉकी संघटनांकडून विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू केले होते़ यासाठी काही परीक्षाही घेण्यात आल्या़ खेळाडू घरीच सराव करत होते़ परंतु ग्राउंडवर एकत्रित सराव करताना बऱ्याच गोष्टी समजून येतात़ ते होत नसल्याने काहींना अडचणीही येत होत्या़ आता खेळाडू येऊ लागले आहेत़ त्यातून अनेकांच्या सरावाला वेग आला आहे़
-प्रा़ खुशाल शर्मा, क्रीडा मार्गदर्शक, नंदुरबाऱ