जिल्ह्यातील प्लास्टिकच्या कच:यातून रस्त्यांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:29 IST2019-10-02T12:28:47+5:302019-10-02T12:29:18+5:30

भूषण रामराजे ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वच्छता ही सेवा या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या हद्दीतून संकलित करण्यात ...

Plastic waste in the district: The construction of roads | जिल्ह्यातील प्लास्टिकच्या कच:यातून रस्त्यांची निर्मिती

जिल्ह्यातील प्लास्टिकच्या कच:यातून रस्त्यांची निर्मिती

भूषण रामराजे । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : स्वच्छता ही सेवा या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या हद्दीतून संकलित करण्यात येणा:या निरुपयोगी प्लास्टिकचा वापर रस्ते बांधणीसाठी होणार आह़े यातून जिल्ह्यात प्रथमच प्लास्टिकयुक्त रस्त्यांची निर्मिती होणार असून यासाठी नगरपालिका प्रशासन मंगळवारपासून कामाला लागल्या आहेत़  
2 ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या हद्दीत सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आह़े तत्पूर्वी गेल्या 11 सप्टेंबर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आह़े  नंदुरबार, शहादा, तळोदा आणि नवापुर येथील नगरपालिका प्रशासन विविध मोहिमांद्वारे प्लास्टिक बंदीसाठी प्रयत्न करण्यात येत आह़े येत्या 4 तारखेर्पयत पालिका हद्दीतून गोळा होणारे प्लास्टिक एकत्र करुन त्याचे वर्गीकरण होणार आह़े यात पुनर्चक्रीकरण प्रक्रिया आणि रस्ते उभारणीसाठी या प्लास्टिकचा वापर होणार आह़े चारही नगरपालिकांसाठी धुळे येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाने प्लास्टिक पुर्नप्रकिया करणा:या संस्थेची नियुक्ती केली असून त्यांच्याकडून पालिका हद्दीतून घंटागाडय़ांद्वारे संकलित केल्या गेलेल्या कच:याचे पुनर्चक्रीकरण करण्याची कारवाई होणार आह़े मोहिमेंतर्गत बुधवारी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणे, सेवाभावी संस्था येथे प्लास्टिक वापर न करण्याची शपथ नागरिकांना दिली जाणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी केली आह़े 

नगरविकास विभागाने काढलेल्या आदेशानुसार नंदुरबार, तळोदा, शहादा आणि नवापुर या चार नगरपालिकांकडून संकलित केल्या जाणा:या कच:याचे पुनर्चक्रीकरण (रिसायकल) करण्यासाठी नाशिक येथील संस्थेची नियुक्ती केली गेली आह़े या चारही पालिकांच्या हद्दीत किमान 10 मेट्रीक टन कचरा गोळा करण्यात येणार आह़े हा कचरा एकत्रित करुन संबधित कंपनी घेऊन जाणार असल्याची माहिती आह़े विघटन व पुनर्चक्रीकरण न होणा:या प्लास्टिकला सिमेंट फॅक्टरीत देण्याचे आदेश होत़े परंतू जिल्ह्याच्या 200 किलोमीटर परीघात एकही सिमेंट फॅक्टरी नसल्याने संकलित केलेले प्लास्टिक सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद व पालिकांच्या रस्ते निर्मिती व डांबरीकरण प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार असल्याचे नियोजन झाले आह़े 

जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेल्या धडगाव शहराला प्लास्टिकमुक्त शहराचा दर्जा मिळण्याची शक्यता आह़े नगरपंचायतीने गत तीन महिन्यांपासून प्लास्टिक बंदी काटेकोरपणे राबवली असल्याने येथे प्लास्टिकच नसल्याचा दावा करण्यात येत आह़े यामुळे येत्या तीन दिवसात होणा:या संकलन अभियानात धडगावचा सहभाग राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आह़े पालिकांकडून या उपक्रमात नागरिकांचा सहभाग करुन घेण्यात आला असून जनजागृतीवर भर देण्यात आला आह़े यात प्रामुख्याने प्लास्टिक बंदीची माहिती देण्यासाठी पालिका कर्मचा:यांना बचत गटांच्या महिला सदस्यांची साथ मिळत आह़े यामुळे जिल्ह्यात 100 टक्के प्लास्टिक बंदी होणार अशी अपेक्षा त्या-त्या पालिकांच्या प्रशासकीय प्रमुखांकडून व्यक्त करण्यात येत आह़े 
 

Web Title: Plastic waste in the district: The construction of roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.