वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST2021-06-06T04:23:00+5:302021-06-06T04:23:00+5:30

या वेळी प्राथमिक स्वरूपात वड, पिंपळ, निंब, बेल, जांभूळ या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी सामाजिक वनीकरण विभागाचे ...

Plantation by Tree Conservation Foundation | वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण

वृक्षसंवर्धन प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण

या वेळी प्राथमिक स्वरूपात वड, पिंपळ, निंब, बेल, जांभूळ या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल एम.बी. चव्हाण, पी.आर. जगताप, आर.एच. चौधरी, रत्ना निकुंभे, प्रतिष्ठानचे प्रदीप पाटील, प्रा. ज्ञानी कुलकर्णी, माधव पाटील, प्रा.अनिल साळुंके, गुरुचरण राजपाल, कचरूलाल जैन, अतिन पटेल, ज्ञानेश्वर चौधरी, के.के. सोनार, पुरुषोत्तम शिंपी, संपत कोठारी, चतुर पाटील, पिनाकिन पटेल, डॉ.विवेक पाटील, डॉ.सोनार, भूषण बाविस्कर, आर.टी. पटेल, मनीष चौधरी, शिवपाल जांगीड, चेतन गांगुर्डे, सुरेश चव्हाण, विवेक भावसार, इस्माईल राजा, वसीम खाटीक, अनरद गावाचे किरण पाटील, किशोर पाटील, राजेंद्र माळी, प्रताप माळी, धनराज माळी आदी उपस्थित होते.

या वेळी वनक्षेत्रपाल चव्हाण म्हणाले की, नियमित पावसाची सुरूवात झाल्यावर अनरद टेकडीवर १६ हजार ५०० विविध प्रकारची रोपे लावली जाणार आहेत. रोपे लावल्यानंतर त्यांचे संवर्धन करणे, वाढ करणे त्यांची जपवणूक करणे यासाठी शहरातील वृक्षसंवर्धन प्रतिष्ठान सहाय्य करणार आहे ही आनंदाची बाब आहे. सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी ठेवली तर निश्चितच वृक्षसंवर्धन यशस्वी होईल, असे सांगितले. प्रा.संपत कोठारी यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. सूत्रसंचालन प्रा.ज्ञानी कुलकर्णी यांनी तर आभार प्रदीप पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे सदस्य व सामाजिक वनीकरण विभागाचे जे.सी. पाटील, लालाभाई कन्हैया, घनश्याम निकुंभ आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Plantation by Tree Conservation Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.