कमोद येथे श्रमदानातून वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST2021-08-24T04:34:15+5:302021-08-24T04:34:15+5:30

वृक्ष लागवडीनंतर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. धडगाव महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एच. एम. पाटील यांनी पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्ष लागवडीचे ...

Plantation through labor at Kamod | कमोद येथे श्रमदानातून वृक्षारोपण

कमोद येथे श्रमदानातून वृक्षारोपण

वृक्ष लागवडीनंतर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. धडगाव महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एच. एम. पाटील यांनी पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्ष लागवडीचे तसेच जल संवर्धनाचे महत्त्व सोप्या भाषेत पटवून दिले. प्लास्टिकचा कमी वापर, पुनर्वापर याविषयी प्रबोधन केले. घरात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पाऊच व पिशव्यांना पाण्याच्या रिकाम्या बॉटल्समध्ये भरुन ईको ब्रीक्स तयार करण्याचे आवाहन बाल गोपालांनी केले. याप्रसंगी पोलीस पाटील दिलवरसिंग भील यांनीही मार्गदर्शन केले. गावाचा विकास करण्यासाठी वृक्षारोपण केलेल्या परिसरात चराई बंदी, कुऱ्हाड बंदी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास उपसरपंच रोहिदास भिल, खेत्या गमणे व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन जल साक्षरता समिती अक्राणीचे प्रा. अनिल शिंदे यांनी तर आभार कार्यक्रमाचे प्रेरक राकेश बोरसे यांनी मानले.

Web Title: Plantation through labor at Kamod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.