हनुमान टेकडी परिसरात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST2021-09-03T04:31:24+5:302021-09-03T04:31:24+5:30
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक व शहादा नगरपालिकेचे गटप्रमुख प्रा. मकरंद पाटील यांनी वाढदिवसानिमित्त माधवी पाटील यांच्यासह ...

हनुमान टेकडी परिसरात वृक्षारोपण
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक व शहादा नगरपालिकेचे गटप्रमुख प्रा. मकरंद पाटील यांनी वाढदिवसानिमित्त माधवी पाटील यांच्यासह हनुमान मंदिर व रेणुका टेकडीवर पूजा केली. या वेळी आई रेणुकादेवी संस्थानचे सचिव प्रा. ज्ञानी कुलकर्णी यांनी प्रा. मकरंद पाटील व माधवी पाटील यांचे स्वागत केले. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र माळी, विश्वस्त प्रा. आर. टी. पाटील, प्रताप माळी, प्रा. आर. एस. पाटील, बापू पाटील, माधव पाटील, ॲड. गोविंद पाटील, किशोर चौधरी, प्रा. नेत्रदीपक कुवर, चेतन माळी आदी उपस्थित होते. मकरंद पाटील व माधवी पाटील यांच्या हस्ते मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. प्रा. पाटील यांनी संस्थानच्या कार्याचे कौतुक करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.