मंगरूळ येथे घनवन पद्धतीने वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST2021-06-16T04:40:29+5:302021-06-16T04:40:29+5:30

या उपक्रमांतर्गत डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटरमार्फत ठिबक, पाण्याची टाकी व मार्गदर्शन, देवराई फाउंडेशनमार्फत ३४४ रोपे व ग्रामपंचायत मंगरूळ यांच्यामार्फत ...

Plantation in dense forest at Mangrul | मंगरूळ येथे घनवन पद्धतीने वृक्षारोपण

मंगरूळ येथे घनवन पद्धतीने वृक्षारोपण

या उपक्रमांतर्गत डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटरमार्फत ठिबक, पाण्याची टाकी व मार्गदर्शन, देवराई फाउंडेशनमार्फत ३४४ रोपे व ग्रामपंचायत मंगरूळ यांच्यामार्फत पाण्याची व्यवस्था, झाडांसाठी खड्डे तर संगोपनाची जबाबदारी बिरसा मुंडा गाव विकास समितीने घेतलेली आहे. यावेळी घनवन (देवराई) पद्धतीने वृक्षलागवड करण्यात आली. कार्यक्रमास गटविकास अधिकाऱ्यांनी पर्यावरण रक्षणात झाडांचे महत्त्व सांगून वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. या वेळी विस्तार अधिकारी पाटील, सरपंच, उपसरपंच, बिरसा मुंडा गाव विकास समिती, मंगरूळ, ग्रामसेवक पंकज दामोदर पिंपळे, आर्डीताराचे डॉ. जागृती पवार, केंद्रप्रमुख उदयकुमार बोरसे, परिचारिका आर. एम. वळवी, आशा कार्यकर्ती छाया रेशमा वळवी, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक कल्पना अलोने, तलाठी दुष्यंत वळवी, आशा कार्यकर्ती रिनाबाई, गाव विकास समितीचे अध्यक्ष जयराम पाडवी, सचिव रवींद्र वळवी, दिनेश हुरजी पाडवी, करणसिंग गावीत आदींनी सहकार्य केले. हा उपक्रम प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी धानोरा विभागप्रमुख प्रवीण अहिरे, किशोर पाटील, प्रकाश सोनवणे आदी उपस्थित होते.

Web Title: Plantation in dense forest at Mangrul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.