बोरचक येथे जनजागृतीसाठी नियोजन सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST2021-05-26T04:31:10+5:302021-05-26T04:31:10+5:30
यावेळी उपसरपंच रमेश गावीत, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील कांतीलाल नाईक, केंद्रप्रमुख पंडित एंडाइत, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राथमिक, ...

बोरचक येथे जनजागृतीसाठी नियोजन सभा
यावेळी उपसरपंच रमेश गावीत, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील कांतीलाल नाईक, केंद्रप्रमुख पंडित एंडाइत, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राथमिक, माध्यमिक, आश्रमशाळा शाळेचे शिक्षक, ग्रामसेवक रिना वळवी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. २८ मे रोजी पूर्व व पश्चिम या दोन्ही गावांचे लसीकरण होईल व २९ मे रोजी वागदे येथे लसीकरण शिबिर घेण्यात येईल, असे नियोजन ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात येऊन पश्चिम बोरचक येथून वाहनांद्वारे ४५ व त्यावरील नागरिकांना वाहनांद्वारे आणून लसीकरण करण्याचे ठरविण्यात आले.
जनजागृतीसाठी तिन्ही गावांमध्ये सर्वांनी एकत्रितपणे फिरून लसीकरणाचे आवाहन करण्यात येणार आहे. याप्रसंगी सर्व शिक्षकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी केंद्रप्रमुख पंडित एंडाईत यांनी मार्गदर्शन केले. आभार ग्रामसेवक रिना वळवी यांनी मानले. याप्रसंगी ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.