भाजीपाला विक्रेत्यांसाठी नंदुरबारात जागा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST2021-04-09T04:32:35+5:302021-04-09T04:32:35+5:30

नंदुरबार : सामाजिक अंतर राखणे सुलभ व्हावे आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फळे व भाजीपाला विक्रेत्यांसाठी प्रशासनाकडून १२ एप्रिलपासून ठिकाणे ...

A place for vegetable sellers in Nandurbar has been fixed | भाजीपाला विक्रेत्यांसाठी नंदुरबारात जागा निश्चित

भाजीपाला विक्रेत्यांसाठी नंदुरबारात जागा निश्चित

नंदुरबार : सामाजिक अंतर राखणे सुलभ व्हावे आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फळे व भाजीपाला विक्रेत्यांसाठी प्रशासनाकडून १२ एप्रिलपासून ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

निश्चित केलेली ठिकाणे अशी-शिवाजी नाट्यमंदिर ते मोठा मारुती मंदिर, अंधारे चौक, जुन्या कोर्टासमोर, तालुका क्रीडा संकुल मैदान, गिरिविहार गेट, कोरीट नाका, आयएमए चौक, सिंधी कॉलनी जवळ, जगतापवाडी बायपास व कन्यादान चौक.

या ठिकाणी भाजीपाला आणि फळेविक्रेते यांनी बसून अथवा हातगाडीवर आपापले व्यवसाय करावे. भाजीपाला व फळांच्या हातगाड्या/ लोटगाड्या यांना निवासी वसाहतीमध्ये फिरून विक्री करता येईल. मात्र, शहरातील मध्यवर्ती ठिकाणे जसे मंगळ बाजार, जळकाबाजार, हाट दरवाजा, शास्त्री मार्केट या ठिकाणी व्यवसाय करता येणार नाही, असे प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: A place for vegetable sellers in Nandurbar has been fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.