पिप्रीपाड्याच्या नशिबी पायपीटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:34 IST2020-02-02T12:34:41+5:302020-02-02T12:34:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुर्गम भागातील माकडकुंड ता.धडगाव येथील पिप्री व अटवीपाडा या पाड्यांपर्यंत अपेक्षेनुसार रस्ते विकासाची कामे ...

Pipripada's luck | पिप्रीपाड्याच्या नशिबी पायपीटच

पिप्रीपाड्याच्या नशिबी पायपीटच

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुर्गम भागातील माकडकुंड ता.धडगाव येथील पिप्री व अटवीपाडा या पाड्यांपर्यंत अपेक्षेनुसार रस्ते विकासाची कामे झाली आहे. गावाच्या मुख्य ठिकाणापासून आठ ते नळ किलोमिटर अंतरावरील नागरिकांना प्रशासकीय कामानिमित्त गावाया मुख्य ठिकाणी पोहोचण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
सर्व गावे व पाडे रस्त्यांनी जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक, वाडीजोड यांच्यासह विविध योजनांच्या माध्यमातून जिल्हांतर्गत रस्त्यांची कामे करण्यात आली. परंतु कात्री ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत अनेक पाडे रस्ते विकासापासून वंचित राहिले आहे. संपूर्ण देशभर वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी व गाव-पाह्यांना एकमेकांच्या संपर्कात आणण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्या तरी या योजनांचा कात्री ग्रामपंचायतीतील या पाड्यांपर्यंत योजना पोहोचल्याच नाही.
रस्ते निर्माण करीत तेथील नागरिकांनाही विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कात्री ग्रामपांचायतीमार्फत ठराव मंजूर करीत शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. परंतु प्रशासन यंत्रणेकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे हा भाग स्वातंत्र्योत्तर अनेक शतके उलटल्यानंतरही व सर्वत्र आधुनिकतेचा अवलंब केला जात असतानाही या पाड्यांवरील नागरिक आजही विकासाच्या प्रवाहापासून वंचित राहिले आहे. या पाड्यांबाबत प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे नागरिकांच्या नशिबी पायपीटच आली आहे. माकडकुंड ता.धडगाव हे गाव मुख्य ठिकाण, पाटीलपाडा, पिप्रीपाडा, अटवीपाडा यासह अनेक पाड्यांमध्ये विभागले आहे. त्यातील पिप्रीपाडा, ओटवीपाडा हे पाडे माकडकुंडच्या मुख्य ठिकाणापासून आठ व नऊ किलोमिटर अंतरावर आहे. या दोन्ही पाड्यांवर अनेक कुटुंब वास्तव्यास आहे. तेथील नागरिकांचे संपूर्ण प्रशासकीय कामे माकडकुंडच्या मुख्य ठिकाणाहून होतात, या कामांसाठी त्यांना आठ ते नऊ किलोमिटर पायपीट करावी लागते.

नर्मदा नदीकाठावरील अनेक गावांपैकी माकडकुंड हे एक सर्वाधिक मोठे गाव आहे. गाव एकच असले तरी त्यातील वाड्या-वस्त्याच जोडल्या गेल्या नाही. त्यामुळे गाव व पाडे जोडण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत पश्न उपस्थित होत आहे. योजना पोहोचल्याच नाही की, त्याचे अन्य मार्गाने पर्यावसन झाले? असाही मुद्दा कात्री ग्रुप ग्रामपंचायतींतर्गत नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
कात्री ग्रामपंचायत अंतर्गतच वाहवाणी या गावातील नोलदापाडा या ठिकाणाची देखील हीच व्यथा आहे. तेथील नागरिकांनाही काही कामासाठी १० ते १२ किलोमिटर पायपीट करावी लागते.

Web Title: Pipripada's luck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.