जनता कर्फ्यूमुळे जिल्ह्यात पीन ड्रॉप सायलेन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:30 IST2020-03-22T12:29:58+5:302020-03-22T12:30:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या एकदिवसाच्या जनता कर्फ्यूला जिल्ह्यात १०० ...

Pin drop silence in district due to Janata curfew | जनता कर्फ्यूमुळे जिल्ह्यात पीन ड्रॉप सायलेन्स

जनता कर्फ्यूमुळे जिल्ह्यात पीन ड्रॉप सायलेन्स

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना विषाणूला थोपवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या एकदिवसाच्या जनता कर्फ्यूला जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे़ नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, नवापुर या सपाटीवरील शहरांसह सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव, मोलगी तोरणमाळ ही गावेही पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत़

नंदुरबार
शहरातील विविध भागात सकाळी सातवाजेपासून पूर्णपणे कर्फ्यूचे पालन करण्यात आले़ यात नागरिकांनी सहभाग घेत सात वाजेपूर्वी गरजेची कामे पूर्ण करुन घेत घरात राहणे पसंत केले होते़ शहरात औषधी विक्रीची दुकाने, खाजगी दवाखाने, दूधविक्रेते, पेपरविक्रेते, जिल्हा रुग्णालय तसेच पालिका रुग्णालयाचे कामकाज नियमित सुरु होते़ सकाळी आठ नंतर पेपर विक्रेते घरी गेले होते़ तर दूध विक्रेत्यांनी १० वाजेनंतर कर्फ्यूमध्ये सहभाग नोंदवला़ रेल्वेस्टेशन व बसस्थानक याठिकाणी संपूर्णपणे शुकशुकाट होता़ बसस्थानकातून एकही बस सुटलेली नव्हती़ खाजगी बसेसही शहरात आलेल्या नसल्याचे दिसून आले़ दरम्यान रेल्वेस्थानकात पोलीस व आरोग्य पथक तैनात करुन रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांची तपासणी करण्यात आली़ पोलीसांकडून वाका ते नंदुरबार दरम्यान पथराई फाटा, धुळे चौफुली, सिबी पेट्रोलपंप यासह विविध भागात पोलीस बंदोबस्त तैनात करुन आढळून येणाºया एखाद-दुसºया वाहनधारकाची तपासणी करुन माहिती घेतली होती़
शहादा
शहरातील विविध भागात सकाळपासूनच शुकशुकाट होता़ तूपबाजार, नेहमी गजबजलेला बसस्थानक परिसर, मोहिदा रोड, सप्तशृंगी माता मंदिर परिसर यासह बºहाणपूर-अंकलेश्वर महामार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता़ शहादा पोलीस ठाण्याकडून ठिकठिकाणी पोेलीस कर्मचारी नियुक्त करुन शहरात तपासणी सुरु होती़
तळोदा
शहरातील मुख्य स्मारक चौकासह सर्वच ठिकाणी शुकशुकाट होता़ ग्रामीण भागातून येणाºया जाणाºया बसेस तसेच वाहने बंद असल्याने शहरात प्रथमच शुकशकाट होता़ औषधी विक्रेत्यांव्यतिरिक्त शहरात एकही दुकान खुले नव्हते़

अक्कलकुवा
गुजरातच्या सिमेवर असलेल्या अक्कलकुवा शहरात सकाळपासून जनता कफ्यूचे पालन सुरु होते़ शहरातील नागरिक सकाळपासून घराबाहेर पडलेच नव्हते़ दरम्यान शहरापासून काही अंतरावर असलेल्या खापर आणि गव्हाळी येथील राज्य सिमा तपासणी नाक्यावर आरोग्य, प्रादेशिक परिवहन आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाकडून गुजरात राज्यातून येणाºया वाहनांची काटेकोरपणे तपासणी सुरु होती़ यात अद्यापही संशयित रुग्ण आढळून आलेला नसल्याची माहिती आहे़

नवापुर
शहरातील बसस्थानक परिसर, लाईट बाजार, मुख्य बाजारपेठेसह तालुक्यातील विसरवाडी, खांडबारा ही मोठी गावे १०० टक्के बंद होती़ नवापुर शहरातील नागरिकांनी घरात राहणे पसंत केल्याने पहाटेपासून शहरात शुकशुकाट होता़ बसेस बंद असल्याने वाहतूक बंद होती़ गुजरात सिमेवरील बेडकी तपासणी नाक्यावर गुजरातमधून येणाºया सर्व वाहनांची काटेकोरपणे तपासणी सुरु असल्याने महामार्गावरही शुकशुकाट होता़

सातपुड्याच्या दुर्गम भागात शुकशुकाट
सपाटीच्या तालुक्यांसह सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव, तोरणमाळ, मोलगी या गावांमध्ये प्रथमच पूर्णपणे बंद करण्यात आला़ आजवरच्या इतिहासात प्रथमच ही गावे बंद झाल्याचे सांगण्यात येत होते़ यात मोलगी येथील बाजार नियमित भरत असल्याने याठिकाणी नागरिकांची कायम असते़ परंतू रविवारी पूर्णपणे शुकशुकाट असल्याचे दिसून आले़

Web Title: Pin drop silence in district due to Janata curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.