तळोदा येथील स्टेट बँकेच्या ग्राहकांना कर्मचाऱ्यांअभावी तासन् तास उभे राहावे लागत असल्याचे चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST2021-02-08T04:27:50+5:302021-02-08T04:27:50+5:30
कायम एटीएम सेवेचा लाभ द्यावा एटीएम सेवेचा हेतूच ग्राहकांना केव्हाही आणि कधीही ग्राहकांना पैसे उपलब्ध व्हावे यासाठीच ही सेवा ...

तळोदा येथील स्टेट बँकेच्या ग्राहकांना कर्मचाऱ्यांअभावी तासन् तास उभे राहावे लागत असल्याचे चित्र
कायम एटीएम सेवेचा लाभ द्यावा
एटीएम सेवेचा हेतूच ग्राहकांना केव्हाही आणि कधीही ग्राहकांना पैसे उपलब्ध व्हावे यासाठीच ही सेवा बँकांनी सुरू केली आहे. मात्र याकडे सर्वच बँकांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा ग्राहकांचा आरोप आहे. सुटीच्या दिवशी तर कधीच एटीएममध्ये पैसे मिळत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. ग्राहक शहरातील सर्व एटीएमवर चकरा मारून अक्षरशः हैराण होत असतात. बहुसंख्य ग्राहक ग्रामीण भागातून पैसे काढण्यासाठी शहरात येतात. परंतु एटीएममधून पैसे निघत नाहीत. त्यावेळी त्यांना निराश होऊन जावे लागते. अशावेळी ते तीव्र नाराजीदेखील व्यक्त करतात. निदान सर्वच बँक प्रशासनाने ग्राहकांना चोवीस तास एटीएम सेवा देण्याबाबत तळोदा शहरातील बँकांना सक्त ताकीद द्यावी, अशी ग्राहकांची अपेक्षा आहे. त्यामुळे बँकेच्या वरिष्ठ प्रशासनाने कर्मचाऱ्यांवरील कामाचा वाढता ताण आणि ग्राहकांना तत्पर सेवा उपलब्ध मिळवून देण्याकरिता तातडीने वाढीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्राहकांकडून जोर धरू लागली आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे. दरम्यान ग्राहकांच्या तत्पर सेवेबाबत लीड बँकेच्या अधिकाऱ्यांनी व प्रमुख महसूल प्रशासनाने ही साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.ख