लोणखेडय़ाच्या सचिनने काढलेल्या चित्राची जगातील पहिल्या पाचात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:21 IST2019-07-26T12:21:10+5:302019-07-26T12:21:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील लोणखेडा येथील रहिवासी सचिन कर्णकाळे या विद्याथ्र्याच्या निसर्ग चित्राची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात ...

Pick up the picture taken by Sachin Tendulkar in the world | लोणखेडय़ाच्या सचिनने काढलेल्या चित्राची जगातील पहिल्या पाचात निवड

लोणखेडय़ाच्या सचिनने काढलेल्या चित्राची जगातील पहिल्या पाचात निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील लोणखेडा येथील रहिवासी सचिन कर्णकाळे या विद्याथ्र्याच्या निसर्ग चित्राची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात आली आह़े औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात तो सध्या शिक्षण घेत आह़े 
लोणखेडा येथील मथुरानगर भागात राहणा:या सचिन कर्णकाळे याचे वडील राजेश कर्णकाळे हे सूतगिरणी कामगार आह़े प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासह चित्रकला पदविका शहाद्यातून प्राप्त करणा:या सचिनचा निसर्ग चित्र काढण्यात हातखंडा आह़े शासकीय कला महाविद्यालयात शिकणा:या सचिन याने अल्बानियात होणा:या ‘तिराना इंटरनॅशनल वॉटरकलर फिनाले 2019’ या स्पर्धेसाठी चित्र पाठवले होत़े प्राथमिक फे:यांमधून वर्चस्व मिळवत सप्टेंबर महिन्यात होणा:या अंतिम फेरीसाठी त्याच्या निसर्गचित्राची निवड करण्यात आली आह़े त्याच्यासोबत जगातील आणखी चौघा कलाकारांची निवड झाली असून सचिन त्यांच्यात सर्वात लहान आह़े कमी वयात त्याला मिळालेल्या यशाचे कौतूक होत असून लोणखेडा व शहादा परिसरात त्याच्या मित्र व कुटूंबियांनी आनंदोत्सव साजरा केला होता़ गत तीन वर्षात शिक्षण घेत असताना सचिन कर्णकाळे याच्या चित्रांचे प्रदर्शन दुबई, बांग्लादेश, कॅनडा या देशांमध्ये प्रदर्शन भरवण्यात आले होत़े सप्टेंबर महिन्यात होणा:या अंतिम फेरीसाठी सध्या त्याची तयारी सुरु असून आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्राची निवड झाल्याचा आनंद असल्याचे सचिन याने सांगितल़े प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने मिळवलेल्या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतूक होत आह़े 
 

Web Title: Pick up the picture taken by Sachin Tendulkar in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.