युवा संमेलनातून संस्कृतीचे दर्शन
By Admin | Updated: January 12, 2015 13:22 IST2015-01-12T13:21:02+5:302015-01-12T13:22:54+5:30
आदिवासी एकता विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या युवा संमेलनातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन जळगावकरांना घडले आहे.

युवा संमेलनातून संस्कृतीचे दर्शन
जळगाव : आदिवासी एकता विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या युवा संमेलनातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन जळगावकरांना घडले आहे.
यश प्लाझा येथे पार पडलेल्या युवा संमेलनाच्या अध्यक्षपदी आदिवासी विकास विभागाचे डी.एफ. तडवी होते. कार्यक्रमाचे उद््घाटन पोलीस उपअधीक्षक किशोर पाडवी यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, साहाय्यक निरीक्षक मंजीत चव्हाण, सहायक निबंधक प्रताप पाडवी, करनिरीक्षक नंदा पाडवी, प्रा.दिलवरसिंग वसावे, प्रा.डॉ. अरुण वळवी, वसतिगृहपाल एन.डी वाघे, सुशील तायडे, शालिनी राऊत, डी.बी.पाटील, किरण राऊत, मदन पावरा, चुनीलाल वळवी, नारासिंग पाडवी उपस्थित होते. वसतिगृहात राहणार्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला आदिवासी पारंपरिक लग्ननृत्य व अंधश्रद्धेला विरोध करणारी नाटिकाही या विद्यार्थ्यांनी सादर केली. सूत्रसंचालन बाळू गावीत यांनी तर आभार लोटन पावरा यांनी केले. यशस्वितेसाठी रूपसिंग वसावे, भिरासिंग वळवी, जयसिंग परांडके, किसन पावरा, संजय पाडवी, हरी गावीत यांनी परिश्रम घेतले.