पी.जी. फार्मसीमध्ये एमएचटी-सीईटीची मोफत ऑनलाईन अर्ज नोंदणी सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST2021-06-17T04:21:27+5:302021-06-17T04:21:27+5:30
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी तंत्रज्ञान औषधनिर्माण शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ...

पी.जी. फार्मसीमध्ये एमएचटी-सीईटीची मोफत ऑनलाईन अर्ज नोंदणी सुविधा
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी तंत्रज्ञान औषधनिर्माण शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी एमएचटी-सीईटीची २०२१ ही प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, अशी सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्टू राज्य मुंबईचे आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी यांनी संकेतस्थळावरून केली आहे.
राज्य सामायिक कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, नियमित शुल्कासह अर्जांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता मंगळवार, ८ जून ते
बुधवार, ७ जुलै २०२१ पर्यंत, तर विलंब शुल्कासह अर्जाची नोंदणी करण्याकरिता ८ ते १५ जुलै असा कालावधी दिला आहे. या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज नोंदणी वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामायिक प्रवेश कक्षाच्या www.mahacet.org अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी.
विद्यार्थ्याकडून या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यात बऱ्याचदा चूक होते. त्या दृष्टीने पी.जी. फार्मसीने एमएचटी-सीईटीची २०२१ ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी सदर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गाची संबंधित कागदपत्रे, ओळखपत्र, आधार कार्ड, फोटो व अर्ज शुल्क भरण्यासाठी एटीएम सोबत आणावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. ए. अहिरराव यांनी केले.