हिना गावीतांच्या विरोधातील याचिका फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:13 IST2019-04-17T12:13:09+5:302019-04-17T12:13:35+5:30
नंदुरबार : भाजप उमेदवार डॉ.हिना गावीत यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार डॉ.सुहास नटावदकर यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या ...

हिना गावीतांच्या विरोधातील याचिका फेटाळली
नंदुरबार : भाजप उमेदवार डॉ.हिना गावीत यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार डॉ.सुहास नटावदकर यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली आहे.
हीना गावीत यांनी उमेदवारी अर्जासोबत जे प्रतिज्ञापत्र सादर केले त्यासाठी वापरण्यात आलेला मुद्रांक शुल्क (स्टॅम्प) कुठून घेतला त्याबाबतचा कुठलाही तपशील नाही. प्रतिज्ञापत्रातील इतर माहितीवरही आक्षेप नोंदवत डॉ.सुहास नटावदकर यांनी विधी सल्लागार अॅड.पी.आर.जोशी यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर न्या.पी.आर.बोरा यांच्या खंडपीठात मंगळवारी दुपारी कामकाज झाले. दोन्ही बाजू ऐकुण न्या. बोरा यांनी दाखल केलेली याचिका फेटाळल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या निवडणुकीत देखील आॅफीस आॅफ प्रॉफिट अन्वये देखील याचिका दाखल करण्यात आली होती ती देखील फेटाळली गेली होती.