कृषी विभागामार्फत आष्टे येथे कीडरोग सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST2021-09-05T04:34:31+5:302021-09-05T04:34:31+5:30
कृषी विभागामार्फत प्रमुख पीक असलेले कापूस, सोयाबीन, भात, तूर, ज्वारी, ऊस व रब्बी हंगामातील हरभरा या पिकांवरील कीडरोगाच्या ...

कृषी विभागामार्फत आष्टे येथे कीडरोग सर्वेक्षण
कृषी विभागामार्फत प्रमुख पीक असलेले कापूस, सोयाबीन, भात, तूर, ज्वारी, ऊस व रब्बी हंगामातील हरभरा या पिकांवरील कीडरोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून पिकांवरील कीड-रोग व सल्ला प्रकल्प योजनेची कृषी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन गावे व तीन पिके असे आठवड्यांतून सहा शेतकऱ्यांचे प्लॉट निवडले जातात. त्यातील पिकांच्या कीड व रोगाच्या नोंदी मोबाईलच्या साहाय्याने नोंदवून ते राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान केंद्रात संकलित केल्या जातात. त्यांना कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या साहाय्याने नोंदींचा अभ्यास करून उपाययोजना व सल्ला विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाकडून दिला जातो व तो कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येतो. यावेळी शेतकरी त्यांचे अवलंब करून आपल्या पिकाचे कीडरोगांपासून संरक्षण करून अधिक उत्पादन घेण्यास फायदेशीर ठरतात. याचा उद्देश शेतकऱ्यांना कीडरोगाची ओळख व त्यांना प्रशिक्षित करून व्यवस्थापन करणे, कीडरोगविषयी जागरूकता निर्माण करणे व संभाव्य नुकसान टाळून उत्पन्नात वाढ करणे, सर्वेक्षण करून वेळीच उपाययोजना करणे, वारंवार येणाऱ्या रोगकिडींचे कायमस्वरूपी व्यवस्थापन करणे, कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने शेतकऱ्यांना उपाययोजना करणे व सल्ला देणे हा आहे.