वेगवेगळ्या घटनेत आठ विवाहितांचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 12:44 IST2021-02-02T12:44:06+5:302021-02-02T12:44:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वेगवेगळ्या घटनेत जिल्ह्यातील आठ विवाहितांचा छळ केल्याची घटना घडली. गेल्या तीन दिवसात वेगवेगळ्या पोलीस ...

वेगवेगळ्या घटनेत आठ विवाहितांचा छळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वेगवेगळ्या घटनेत जिल्ह्यातील आठ विवाहितांचा छळ केल्याची घटना घडली. गेल्या तीन दिवसात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मजुरीला जात नाही
धडगाव तालुक्यातील बिजरीचा वियारावड येथील सुनिता भिमसिंग वळवी या विवाहितेचा गावातीलच सासरी घरातील काम येत नाही, मजुरीला जात नाही म्हणून सासरच्या लोकांनी छळ केला. छळाला कंटाळून सुनिताबाई यांनी फिर्याद दिल्योन भमसिंग डोंगा वळवी, डोंगा माद्या वळवी, रानुबाई डोंगा वळवी, रा.बिजरीचा वियारावड यांच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात झाला छळ
दुसरी घटना गोरखपूर येथे घडली. नंदुरबारातील पटेलवाडी भागातील विवाहिता सैय्यद नुरसबा यांचा विवाह सैय्यद मोहम्मद अब्दुल आलम यांच्याशी झाला होता. सासरची मंडळी चारित्र्याच्या संशयावरून त्यांना त्रास दिला जात होता. त्या त्रासाला कंटाळून महिलेने फिर्याद दिल्याने सैय्यद अब्दूल आलम, नफिसा खातून आलम यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
पैशांसाठी मारहाण
तिसरी घटना ठाणेपाडा, ता.नंदुरबार येथील विवाहितेबाबत घडली. मनिषा संतोष सुर्ववंशी या विवाहितेचा सासरी गुलतारे, ता.साक्री येथे माहेरून पैसे आणण्यासाठी छळ केला जात होता. त्याला कंटाळून मनिषा यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून संतोष रामदास सूर्यवंशी, रामचंद्र जानू सूर्यवंशी, रत्नाबाई रामचंद्र सूर्यवंशी, बेडकीखडी, अनिता कोकणी, भिल्या कोकणी, रा.गुलतारे यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात जणांवर गुन्हा
चौथी घटना भागापूर, ता.शहादा येथे घडली. पूजा पंकज पाटील, रा.पुरुषोत्तमनगर यांचा सासरी भागापूर येथे छळ केला जात होता. त्याला कंटाळून त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पंकज मधुकर पाटील, रा.वापी, मधुकर उद्धव पाटील, लिलाबाई मधुकर पाटील, नंदकिशोर मधुकर पाटील, रा.लोणखेडा, कविता संजय पाटील, संजय श्रीपत पाटील व निशा पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलबाळ होणार नाही म्हणून त्रास
पाचवी घटना सोनगीर येथे घडली. अपंग मुलगी झाली, त्याचवेळी गर्भपिशवी काढण्यात आली, त्यामुळे आता मुलबाळ होणार नाही म्हणून विवाहितेचा छळ केल्याने कोंढावळ, ता.शहादा येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुरेखा विलास बागुल या विवाहितेचा छळ करण्यात येत होता. त्याला कंटाळून त्यांनी फिर्याद दिल्याने विलास हिराजी बागुल, हिराजी गबा बागुल, निर्मला हिराजी बागुल, रा.कोंढावळ, ता.शहादा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोकरीवाली सून पाहिजे
सहावी घटना खळीबर्डी, ता.नवापूर येथे घडली. नोकरीवाली सून पाहिजे होती, दिसायला सुंदर नाही तसेच पतीच्या विवाहबाह्य संबधाविषयी जाब विचारल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. दीपिका उत्कर्ष गावीत यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून उत्कर्ष हरिष गावीत, दिनाबाई हरीष गावीत, हरीष बापू गावीत रा. खळीबर्डी यांच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० लाख रुपये आणावे
सातवी घटना नंदुरबारच्या विवाहितेविषयी घडली. प्रिंकल निलेश गायकवाड, रा.सरगम कॅालनी, नंदुरबार यांचा यावल, जि.जळगाव येथे सासरी छळ झाला. पतीच्या नोकरीसाठी माहेरून २० लाख रुपये आणावे यासाठी छळ केला जात होता. त्याला कंटाळून प्रिंकल गायकवाड यांनी फिर्याद दिल्याने निलेश राजेंद्र गायकवाड, राजेंद्र चिंतामण गायकवाड, शैलाबाई गायकवाड, वैशाली प्रशांत जाधव, सर्व रा.गणपतीनगर, यावल यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तलाक देण्याची धमकी
आठवी घटना यावल, जि.जळगाव येथेच घडली. नंदुरबारातील कसाई मोहल्ला भागात राहणारी फौजियानाज मोहसीन खान या महिलेचा माहेरून दहा लाख रुपये आणावे यासाठी छळ करण्यात येत होता. तलाक देण्याची धमकी दिली जात होती. त्या छळाला कंटाळून फौजियाखान यांनी फिर्याद दिल्याने मोहसीन खान आबीदखान, जरीना आबीदखान, आसिफखान आबीदखान, मोहसीनाबी आबीदखान, जावेदखान आबीदखान, रुबीनाबी जावेदखान सर्व रा.डांगपूरा कुरेशी मोहल्ला, यावल यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.