नंदुरबारातील विकासकामांसाठी वाळू देण्याचा ‘स्थायी’ ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 11:44 IST2018-03-14T11:44:08+5:302018-03-14T11:44:08+5:30
जिल्हा परिषद स्थायी समिती : विभागवार कामांचा आढावा घेत विकासकामांची उजळणी

नंदुरबारातील विकासकामांसाठी वाळू देण्याचा ‘स्थायी’ ठराव
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 14 : जिल्हा परिषदेने मंजूर केलेली विकासकामे वाळू नसल्याने रखडली आहेत़ याकामांना गती मिळावी म्हणून जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत ठराव करण्यात आह़े जिल्हाधिकारी यांना हा ठराव देण्यात येणार आह़े
जिल्हा परिषदेत मंगळवारी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली़ अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ प्रसंगी उपाध्यक्ष सुहास नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी़एम़ मोहन, महिला व बालकल्याण समिती सभापती लताबाई पाडवी, समाजकल्याण सभापती आत्माराम बागले, अर्थ व बांधकाम समिती सभापती दत्तू चौरे, समिती सदस्य रतन पाडवी, अभिजीत पाटील, सागर धामणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होत़े बैठकीत जनसुविधांच्या कामांवर चर्चा करण्यात आली़ प्रारंभी मागील बैठेकीचे इतिवृत्त वाचण्यात आल़े यातील बोरद ता़ तळोदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील मोबाईल युनिट प्रतापपूर येथे कार्यरत असल्याच्या बाबीवर उपाध्यक्ष नाईक यांनी हरकत घेत, दोन महिन्यांपूर्वी अहवाल मागूनही मोबाईल युनिटचा प्रश्न प्रलंबित असल्याने नाराजी व्यक्त केली़ आरोग्याधिकारी डॉ़ एऩडी़बोडखे यांनी याबाबत कारवाई सुरू असून अहवाल सादर करणार असल्याचे सांगितल़े अध्यक्षा नाईक व इतर सदस्यांनी अहवाल तात्काळ मागवत त्यावर चर्चा केली़
यानंतर गताडी ता़ नवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वीज आणि पाणी उपलब्ध करून देण्याबाबत समितीने विचारणा केली असता, बांधकाम विभागाच्या अधिका:यांनी वीज व पाण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याची गरज असल्याचे सांगितल़े येत्या बैठकीर्पयत हे अंदाजपत्रक सादर होणार आह़े
जिल्हा परिषदेला नवीन सात वाहने आणि पाणीटंचाईच्या कामांचा आढावा घेण्यात आला़