शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

महामार्ग सुरू करण्यासाठी लोकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पूर्णपणे बंद झालेली रहदारी पर्यायी व्यवस्था उभारून सुरू करण्याचा राष्ट्रीय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पूर्णपणे बंद झालेली रहदारी पर्यायी व्यवस्था उभारून सुरू करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिका:यांचा निर्णय अंमलात न आल्याने महामार्गावरील व्यावसायिकांनी लोकवर्गणी उभारून कामास सुरूवात केली आहे. बुधवारपासून रहदारी सुरू करण्यासाठी प्रय} होत आहेत. दोन आठवडय़ांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे रांयगण शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील ब्रिटिशकालीन फरशी तुटल्याने महामार्ग पूर्णत: बंद झाला. ही घटना घडून सहा दिवस झाले असतांना पर्यायी व्यवस्था होत नसल्याचे पाहून चिंचपाडा येथील मनिष ओमप्रकाश अग्रवाल व सहका:यांनी सोमवारी स्वखर्चाने पुलाचे काम करण्याचा बेत आखला व प्रत्यक्ष कामास सुरूवातही केली. क्षतिग्रस्त पुलाच्या शेजारी असलेल्या जुन्या मार्गालगत पाईप टाकून त्यावर मुरूमाचा भराव करुन 13 ऑगस्टपासून तीन व चारचाकी वाहनांची ये जा  सुरू झाली. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिका:यांना ही बाब समजल्यावर त्यांनी 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी रायंगण येथे भेट दिली. महामार्गावर नवीन पुलाची उभारणी येत्या एक महिन्याच्या कालावधीत युध्दस्तरावर करण्यात येईल व पर्यायी व्यवस्था म्हणून तुटलेल्या पुलाच्या समांतर मुरूमाचा भराव करुन वळणरस्ता उभारून येत्या चार दिवसात महामार्गावरील रहदारी पूर्ववत सुरू करण्यात येईल असे, महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, तांत्रिक व्यवस्थापक रवींद्र इंगोले यांनी जाहीर केले होते.महामार्ग बंद पडल्याने त्याचा वापर करणारे प्रवासी व वाहनधारक हाल अपेष्टा सोसत आहेत. तर दुसरीकडे महामार्गालगत असलेले हॉटेल व इतर व्यावसायिक, पेट्रोल पंप मालकांना दररोज लाखो रूपयांचा फटका बसत आहे. शालेय विद्याथ्र्याना फेरा मारून ये-जा करावी लागत आहे. वाहनधारकदेखील मोठय़ा अंतराचा फेरा मारून मार्गक्रमण करीत आहेत. सिमा परिवहन तपासणी नाका व वन महसूल नाका या फे:यात टाळला जात असल्याने शासनाचाही कोटय़ावधीच्या घरातील महसूल बुडाला आहे. राष्ट्रीय महामार्ग सुरळीत वाहतुकीसाठी खुला करून देण्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता दिली जावी हे अपेक्षित असतांना 14 ऑगस्ट रोजी महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिका:यांनी भेट देवून घोषणा केल्यानंतर आठ पाईप व दोन डम्पर मुरूम पाठविले. ते  वगळता इतर काहीच हालचाल झाली नसल्याचे पाहून महामार्गावरील पेट्रोल पंप धारक, ऑटो पार्टस विक्रेते, हॉटेल व्यावसायिक व चहा विक्रेते असे सर्व घटक एकत्र आले असून, त्यांनी उभारलेल्या लोकवर्गणीच्या दीड लाख रूपये रक्कमेतून जेसीबी यंत्र व डम्परच्या सहाय्याने मुरूम आणून पर्यायी रस्ता उभारणीचे काम हाती घेतले आहे. सोमवारी एका दिवसात झालेल्या कामाची गती पाहता मंगळवारी सायंकाळ पावेतो पर्यायी वळणरस्ता उभारला जावून बुधवार सकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रय} असल्याची माहिती मनिष अग्रवाल व धर्मेश अग्रवाल या व्यावसायीकांनी दिली. जिल्हाधिकारी व  पालकमंत्री यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नंदुरबार येथील 21 ऑगस्टच्या प्रस्तावित भेटीत या विषयावर त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रय} करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिका:यांनी पुलाच्या उभारणीचे काम महिना भरात पूर्ण करण्याचे आश्वासन देवून आठवडा असाच निघून गेला आहे. राष्ट्रीय महामार्गाची आजची व आजवरची स्थिती पाहता त्याला वाली नसल्याचा समज वाढीस येत असून उभारला जाणारा पर्यायी वळणरस्ता अवजड वाहतुकीपुढे किती व कसा टिकेल यासह नवीन पुलाची निर्मिती कधी सुरू होईल व नवीन पूल  वाहतुकीसाठी कधी उपलब्ध होईल या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देणार आहे.