अखेर पेन्शनरांना मिळाले हक्काचे कायदेविषयक सल्ला केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:57 IST2021-02-06T04:57:36+5:302021-02-06T04:57:36+5:30

याप्रसंगी अ‍ॅड. गोविंद पाटील ,अ‍ॅड.पद्माकर देशपांडे ,पोलीस निरीक्षक भरत जाधव, डॉ. प्रवीण डोंगरे ,सुधाकर वैद्य, सय्यद ई. डी. लियाकतअली ...

Pensioners finally get the right legal advice center | अखेर पेन्शनरांना मिळाले हक्काचे कायदेविषयक सल्ला केंद्र

अखेर पेन्शनरांना मिळाले हक्काचे कायदेविषयक सल्ला केंद्र

याप्रसंगी अ‍ॅड. गोविंद पाटील ,अ‍ॅड.पद्माकर देशपांडे ,पोलीस निरीक्षक भरत जाधव, डॉ. प्रवीण डोंगरे ,सुधाकर वैद्य, सय्यद ई. डी. लियाकतअली , शंकरलाल अग्रवाल, मधुकर साबळे, बारकू पाटील, प्रा. डॉ. पितांबर सरोदे, दीनानाथ मनोहर आदी उपस्थित होते

यावेळी वसुमना पंत यांनी सांगितले, जसजसा समाज सुधारतो आहे तशा ज्येष्ठांच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. मुलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की आई-वडिलांनी आपल्याला मोठे केले, शिक्षण दिले आणि जेव्हा ते वृद्ध होतात तेव्हा मुलांनी त्यांच्या समस्या व त्यांना समजून घेतले पाहिजे. ज्येष्ठांनी आपले अधिकार काय आहेत त्याची माहिती करून घेतली पाहिजे. शासनाने ज्येष्ठांसाठी विविध कायदे केलेले आहेत त्याचा फायदा घेतला पाहिजे, असे सांगितले.

जाधव यांनी एकत्र कुटुंब पद्धती जाऊन आता विभक्त कुटुंब पद्धतीत ज्येष्ठांना डावलले जात आहे व त्यासाठी कायद्याची गरज पडत असल्याचे सांगितले. डोंगरे यांनी ज्येष्ठांमधील मानसिक समस्या व आरोग्य, स्मृतिभ्रंश, आहार, नैराश्य, व्यसन याबाबत माहिती देऊन १०४ या हेल्पलाइन नंबर व संपर्क साधण्याचे आवाहन केले. अ‍ॅड. देशपांडे, अ‍ॅड. पाटील व सुधाकर वैद्य यांनी ज्येष्ठांना मृत्युपत्राबाबत व कायद्याबाबत माहिती दिली. प्रास्ताविक बारकू पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप पाटील, तर आभार मधुकर साबळे यांनी मानले.

Web Title: Pensioners finally get the right legal advice center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.