शिक्षकांना सेवानिवृत्तीच्या दिवशी पेन्शनचा धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST2021-06-09T04:38:18+5:302021-06-09T04:38:18+5:30
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. राहुल चाैधरी, गटविकास अधिकारी महेश पोतदार, गटशिक्षणाधिकारी आर.आर. देसले, शिक्षण विस्तार अधिकारी एम.आर. निकुंभ, ...

शिक्षकांना सेवानिवृत्तीच्या दिवशी पेन्शनचा धनादेश
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ. राहुल चाैधरी, गटविकास अधिकारी महेश पोतदार, गटशिक्षणाधिकारी आर.आर. देसले, शिक्षण विस्तार अधिकारी एम.आर. निकुंभ, केंद्रप्रमुख सयाजी वसावे, मोहन बिसनारिया आदी उपस्थित होते. यावेळी ब्राह्मणगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नरपतसिंग बाज्या वसावे, उमरकुवा जिल्हा परिषद शाळेचे तालीम धनजी ब्राह्मणे व बिजरीपाटी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक डोंगरसिंग गणपत वसावे यांना शिक्षणाधिकारी राहुल चौधरी यांच्या हस्ते पेन्शनचा धनादेश देण्यात आला. दरम्यान जून किंवा जुलै महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनादेखील त्याच दिवशी पेन्शनच्या रकमेचा धनादेश अदा करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकरी राहुल चाैधरी यांनी दिली. सूत्रसंचालन अजयकुमार शिंपी यांनी केले. शेखर साबळे, सुरुपसिंग वळवी, मोगीलाल चौधरी, भरत तडवी, फिरोज शेख आदींनी परिश्रम घेतले.