खबरदाऱ़ थुंकल्यास ५ हजारापर्यंत दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 13:03 IST2020-04-28T13:03:48+5:302020-04-28T13:03:55+5:30

नंदुरबार : सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे यापुढे गुन्हा ठरणार आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी पारित ...

Penalty up to Rs 5,000 for careful spitting | खबरदाऱ़ थुंकल्यास ५ हजारापर्यंत दंड

खबरदाऱ़ थुंकल्यास ५ हजारापर्यंत दंड

नंदुरबार : सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे यापुढे गुन्हा ठरणार आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केलेल्या आदेशानुसार या प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना थेट पाच हजार रुपयांचा दंड होणार आहे़ लागू झालेल्या साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत हे जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी सोमवारी रात्री उशिरा याबाबतचे आदेश काढले़
आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ नुसार व महाराष्ट्र कोविड १९ नियमन २०२० च्या कलम ३ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे़ अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर जाण्याची परवानगी असलेल्यांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे़


आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी थुकल्यास प्रथम ५०० रुपये दंड होणार आहे़ दुसऱ्यांदा थुंकताना आढळल्यास २ हजार तर तिसऱ्यांदा एखादी व्यक्ती थुंकताना आढळल्यास थेट ५ हजार दंड करण्यात येणार आहे़
सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी मास्कचा वापर न करता येणाºयांना प्रथम १ हजार, दुसºयांदा २ हजार तर तिसºयांदा आढळल्यास पाच हजार रुपये दंड करण्यात येणार आहे़
सोशल डिस्टन्सिंग न पाळणाºयांना प्रथम ५००, दुसºयांदा आढळल्यास २ हजार तर तिसºयांदा आढळून आल्यास ५ हजार रुपयांचा रोख दंड भरावा लागेल़

Web Title: Penalty up to Rs 5,000 for careful spitting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.