महिलेस मारहाणप्रकरणी दंडाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:34 IST2020-02-29T12:34:42+5:302020-02-29T12:34:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महिलेवर तलवारीने वार करून जखमी केल्याप्रकरणी एकास नवापूर प्रथमवर्ग न्यायालयाने चांगल्या वर्तवणुकीचा बॉण्ड करून ...

महिलेस मारहाणप्रकरणी दंडाची शिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महिलेवर तलवारीने वार करून जखमी केल्याप्रकरणी एकास नवापूर प्रथमवर्ग न्यायालयाने चांगल्या वर्तवणुकीचा बॉण्ड करून देण्यासह पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
वडखूट, ता.नवापूर येथे ही घटना आॅगस्ट २०१४ मध्ये घडली होती. गावातील रामदास गावीत व कौशल्याबाई दलपत गावीत यांच्यात पाईप लाईन तोडल्यावरून वाद होता. त्यावरून दिपक जया गावीत हे कौशल्याबाई यांच्या घरी जावून त्यांना विचारणा करीत होते. त्यावेळी कौशल्या यांचा दीर जितेंद गावीत हा दिपक यांना समजविण्यास गेला. तेंव्हा त्याला मारहाण करण्यात आली.
कौशल्याबाई व त्यांची दिराणी सोडविण्यास गेले असता दिपक गावीत यांनी कौशल्याबाई यांच्यावर तलावरीने वार करून पायाला दुखापत केली होती. सहायक पोलीस निरिक्षक जे.बी.सपकाळे यांनी नवापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दोषारोपपत्र सादर केले.
न्यायालयाने दिपक जया गावीत यांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा आणि एक वर्ष चांगल्या वर्तवणुकीचा बॉण्ड लिहून देण्याचे आदेश दिले. सरकार पक्षातर्फे अजय सुरळकर यांनी काम पाहिले, पैरवी अधिकारी म्हणून प्रतापसिंग वसावे होते.