प्लास्टीक विक्रेत्यांविरोधात शहाद्यात दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:20 PM2019-12-10T12:20:46+5:302019-12-10T12:20:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नगरपालिकेच्या प्लास्टीक नियंत्रण पथकान शहरातील एका दुकानावर धाड टाकत ३५ किलो प्लास्टीक पिशव्या जप्त ...

Penalty action against the plastic vendors in martyrdom | प्लास्टीक विक्रेत्यांविरोधात शहाद्यात दंडात्मक कारवाई

प्लास्टीक विक्रेत्यांविरोधात शहाद्यात दंडात्मक कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : नगरपालिकेच्या प्लास्टीक नियंत्रण पथकान शहरातील एका दुकानावर धाड टाकत ३५ किलो प्लास्टीक पिशव्या जप्त केल्या असून विक्रेत्यावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
प्लास्टीक बंदी कारवाईअंतर्गत सोमवारी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या आदेशान्वये पालिकेच्या प्लास्टिक नियंत्रण पथकाने शहरात कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान अजमेरी सेल्स या दुकानावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या आढळून आल्या. पथकाने संपूर्ण प्लास्टिक जप्त करून दुकानदारास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्याचप्रमाणे काही किरकोळ दुकानदारांकडून प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आल्या असून एकून २३ किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आल्या.
या पथकात राजू चव्हाण, सचिन महाडिक, चेतन गांगुर्डे, गोटूलाल तावडे, स्वप्निल पाटील यांचा समावेश होता. शहरातील किरकोळ विक्रेत्यांनी प्लास्टिकचा वापर करू नये. यापुढील काळात पालिकेतर्फे प्लास्टीक नियंत्रण मोहीम तीव्र केली जाणार असून ज्या विक्रेत्यांकडे प्लास्टीकच्या पिशव्या आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिला असून नागरिकांनीही प्लास्टीकचा पिशव्यांचा आग्रह करू नये, असे सांगितले.

Web Title: Penalty action against the plastic vendors in martyrdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.