मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:41 IST2019-11-02T12:40:56+5:302019-11-02T12:41:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोटारसायकलस्वाराने पुढे चालणा:या एकास धडक दिल्याची घटना 30 नोव्हेंबर रोजी घडली होती़ धडकेत जखमी ...

मोटारसायकलच्या धडकेत पादचारी ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मोटारसायकलस्वाराने पुढे चालणा:या एकास धडक दिल्याची घटना 30 नोव्हेंबर रोजी घडली होती़ धडकेत जखमी झालेल्या पादचारीचा मृत्यू झाला़ नागसर ता़ नंदुरबार गावाजवळ ही घटना घडली़
इंद्रसिंग हेमा पवार (30) असे मयताचे नाव असून त्याला दिलीप भिवसन गवळी रा़ सोनगीरपाडा ता़ नंदुरबार याने धडक दिली होती़ 30 नोव्हेंबर रोजी इंद्रसिंग पवार हा पायी नागसरकडे जात असताना दिलीप गवळी याने त्याच्या ताब्यातील एमएच 39 बी 3517 ही दुचाकी भरधाव वेगात चालवून मागून धडक दिली होती़ धडकेत इंद्रसिंग हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला़ अपघातानंतर संशयित दिलीप याने घटनास्थळावरुन पळ काढला होता़
याप्रकरणी गुरुवारी अमृत हेमा पवार यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन दिलीप गवळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े